Beed Neknur Police Station Saamtv
महाराष्ट्र

Beed Crime: बीडच्या नेकनूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

Beed Neknur Crime News: पोलीस ठाणे असणाऱ्या बीडच्या (Beed) नेकनूरमध्ये चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.

विनोद जिरे

Beed Crime News: बीड जिल्ह्यात सध्या चोरट्यांचा चांगलाच धुमाकूळ पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिस ठाणे असलेल्या नेकनूर शहरातच चोरट्यांनी दहशत निर्माण केल्याचे समोर आले आहे. शहरात एकाच रात्री चार ठिकाणी धाडसी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस ठाणे असणाऱ्या बीडच्या (Beed) नेकनूरमध्ये चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. एकाच रात्री चार ठिकाणी धाडसी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आले आहे. यामध्ये रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

चोरीमध्ये चोरट्यांनी कामानिमित्त निमित्त बाहेरगावी गेलेल्या कानडे कुटुंबावर पाळत ठेवून कुलुप तोडून आत प्रवेश करत कपाटातील रोख रक्कम सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. यावेळी चोरट्यांनी शेजारच्या घराच्या दरवाज्यांना बाहेरून कडी लावली होती. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News)

चोरट्यांना नाही पोलिसांचा धाक...

दरम्यान, घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच पोलिस स्टेशनच्या हद्दीतच चोरट्यांनी हात साफ केल्याने चोरट्यांना पोलिसांचा धाक उरला आहे का नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT