Beed Crime News saam tv
महाराष्ट्र

Beed Crime : बीडमध्ये गुंडाराज सुरूच! ५० हजारांसाठी कंत्राटदाराला मारहाण; व्हिडीओ फोटोंसह पुरावे दिले

Beed Crime News : एका कंत्राटदाराला ५० हजार रुपयांसाठी अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर दीड महिना होऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचे पीडित कंत्राटदाराने म्हटले आहे.

Yash Shirke

  • बीडमध्ये गुंडाराज सुरूच, पैशांसाठी जीवघेणा हल्ला

  • कंत्राटदाराला फक्त ५० हजारांसाठी मारहाण

  • दीड महिना होऊनही गुन्हा दाखल झाला नाही

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असल्याचे पाहायला मिळत आहे. बीडमध्ये मारहाण, हाणामारीचे प्रकार सुरु आहेत. आता बीडच्या पाटोदा तालुक्यात कंत्राटदाराला मारहाण झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराला ५० हजार रुपये दे नाहीतर काम बंद कर अशी धमकी देत अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर पीडित कंत्राटदार सलीम जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. यादरम्यान पोलिसांनी कंत्राटदाराचा जवाब नोंदवून घेतला. या घटनेला दीड महिना पूर्ण झाला असला तरीही गुन्हा दाखल करण्यात आला नसून आरोपी अद्यापही मोकाट आहेत, असे पीडित व्यक्तीने म्हटले आहे.

पीडित कंत्राटदार शेख मुजम्मिल यांच्या अंगावर गंभीर स्वरुपाच्या जखमा आहेत, मला जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण झाली आहे. घटना घडून तब्बल दीड महिना होऊनही न्याय मिळत नसल्याने मी नैराश्यात गेलो आहे. माझ्या जीवाचे बरं वाईट होईल, माझ्या जीवाला या लोकांकडून धोका आहे, मला तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी कंत्राटदाराने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

शेख मुजम्मिल यांनी आज (१३ ऑगस्ट) सर्व पुरावे आणि मारहाणीचे फोटो बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे सुपूर्त केले आहेत. मला न्याय मिळावा असे निवेदन पीडित व्यक्तीने केले आहे. कुठल्या राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा पोलिसांवर दबाव आहे, या दबावापोटी माझा गुन्हा ते दाखल करुन घेत नाहीत, अशी प्रतिक्रिया शेख मुजम्मिल यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आजपासून दोन दिवस वाशिमच्या दौऱ्यावर

Infinix GT 30 5G+ स्मार्टफोन, 144Hz AMOLED डिस्प्लेसह दमदार फिचर्स आणि किंमत

HSRP Number Plate: उरले फक्त २४ तास! HSRP नंबरप्लेट बसवा अन्यथा भरावे लागणार १०,००० रुपये; ऑनलाइन प्रोसेस वाचा सविस्तर

Guruwar che Upay: गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूंचे हे उपाय अवश्य करा; अशुभ प्रभावातून मिळेल सुटका

Pakistan Vs India: पाकिस्तानचे राज्यकर्ते का माजले? अमेरिकेच्या अणुबॉम्बवर पाकच्या उड्या?

SCROLL FOR NEXT