beed, ashram school, zilla parishad school, principal, beed ceo ajit pawar saam tv
महाराष्ट्र

Beed News : बीडच्या सीईओंचा दणका, शालेय पोषण आहारावर डल्ला मारणारा मुख्याध्यापक निलंबित

भ्रष्टाचार निर्मूलन समितीने आंदाेलन छेडले हाेते.

विनोद जिरे

Beed News : बोगस पटसंख्या दाखवत शालेय पोषण आहारावर डल्ला मारणाऱ्या मुख्याध्यापकाला बीड जिल्हा परिषदेच्या सीईओंनी (beed zilla parishad ceo ajit pawar) चांगलाच दणका दिला आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यात असणाऱ्या वडझरी येथील संत शिरोमणी भगवानबाबा प्राथमिक आश्रम शाळेमध्ये शालेय पोषण आहार योजनेत प्रचंड प्रमाणात अनियमितता आढळून आली. (Maharashtra News)

याप्रकरणी मुख्याध्यापक प्रवीण लिंबाजी वनवे (pravin limbaji vanve) यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्याचे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत.

मातोश्री सेवाभावी संस्था संचलित संत शिरोमणी भगवानबाबा प्राथमिक आश्रम शाळा वडझरी, ता. पाटोदा, जि. बीड यांनी बोगस तसेच भुतलावर अस्तित्वात नसलेल्या पटसंख्या दाखवून वर्गवाढ करणे, विद्यार्थ्यांची बोगस संख्या दाखवून शालेय पोषण आहार गैरव्यवहार तसेच शिक्षक पात्रता परीक्षा पास नसताना शिक्षक भरती करून शैक्षणिक वर्ष 2022-22 मध्ये शासनाची फसवणूक करून कर्मचारी भरती करणे आदी गैरव्यवहार प्रकरणात कारवाई करावी, यासाठी सहशिक्षक धनंजय सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार निवेदने दिली.

त्यानंतर भ्रष्टाचार निर्मूलन समितीने 29 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मांगो आंदोलन (aandolan) करून वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता सोईओ पवार यांनी ही कारवाई केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

SCROLL FOR NEXT