Beed Breaking News Saam Digital
महाराष्ट्र

Beed Breaking News : पंढरपूरहून बीडकडे येणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोचा भीषण अपघात; वाहनात होते २५ वारकरी

Sandeep Gawade

पंढरपूरहून बीडकडे परतीच्या प्रवासाला असणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास 25 वारकरी जखमी झाले असून ३ महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टेम्पो पिकअपचे टायर फुटल्याने अपघात झाला आहे. वारकरी कन्नड तालुक्यातील दहिगाव येथील रहिवासी आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील दहिगाव येथील वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला गेला होते. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर ते आज रात्री टेम्पोने बीडच्या दिशेने निघाले होते. दरम्यान बीडनजीक पोहचात त्यांच्या वाहनाचा अपघात भीषण अपघात झाला.

या अपघातात जवळपास 25 वारकरी जखमी झाले आहेत. त्यापैकी ३ महिला वारकरी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टेम्पो पिकअपचे टायर फुटल्याने अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT