Rohit Pawar Vs Chagan Bhujbal Saam TV
महाराष्ट्र

Rohit Pawar News: छगन भुजबळांंमागे अदृश्य हात? मराठा ओबीसी वादावर रोहित पवारांचे मोठे विधान

Rohit Pawar On Chhagan Bhujbal: मराठा ओबीसी वाद हा लोकांमध्ये नाही, हा वाद नेत्यांमधून घडवला जातोय.. असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला.

विनोद जिरे

Beed Breaking News:

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेली संघर्ष यात्रा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. रोहित पवार यांच्या या यात्रेला नागरिकांचा, तरुणांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. ही संघर्ष यात्रा सध्या बीड जिल्ह्यात आहे. या दरम्यान, आज (सोमवार, २० नोव्हेंबर) रोहित पवार यांनी आमदार संदीप क्षिरसागर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

काय म्हणाले रोहित पवार?

"अगोदर 3 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला अन त्यानंतर शेतकऱ्यांनी आक्रोश केल्यानंतर सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर केले. सुरुवातीला दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यातील मदत आणि नंतर दुष्काळ जाहीर केलेल्या 8 तालुक्यातील मदत यामध्ये तफावत आहे. आता शेतकऱ्यांना मुलाच्या फीची चिंता आहे.." असे रोहित पवार (Rohit Pawar) यावेळी म्हणाले.

युवांच्या प्रश्नांसाठी संघर्ष यात्रा...

"युवांच्या नोकरीच्या प्रश्नासाठी ही यात्रा काढली आहे. मुद्द्याचं बोला अस आम्ही नेत्यांना बोलत आहोत. जर या शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढू शकतील.." अशी चिंताही आमदार रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा ओबीसी वादावर मोठे विधान..

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी सध्या आरक्षणावरुन सुरू असलेल्या मराठा ओबीसी वादावर मोठे विधान केले. "मराठा ओबीसी वाद हा लोकांमध्ये नाही, हा वाद नेत्यांमधून घडवला जातोय.. असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे ओबीसी नेते होण्याचा प्रयत्न करतायेत.." असेही ते यावेळी म्हणाले.

तसेच "हा वाद मिटवण्यापेक्षा जबाबदार मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे भाषणे देत आहेत. सर्व नेत्यांनी दिल्लीत बसून हा वाद मिटवावा. असे म्हणत भुजबळांमागे अदृश्य हात असू शकतो," असे मोठे विधानही रोहित पवार यांनी यावेळी केले आहे. बीड शहरामध्ये जे काही झालं त्यामध्ये सरकारमधील एका व्यक्तीचा हात होता.." असा आरोपही त्यांनी केलाय. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Parishad Result 2026: महायुतीचा दणदणीत विजय, मविआची मते फुटली; सर्व १७ जागांचा संपूर्ण निकाल एकाच क्लिकवर

Maharashtra News Live Update : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात भीषण अपघात

Weekly Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणूकीतून फायदा होणार आहे, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

नजर होईल गरुडासारखी तीक्ष्ण! रोज खा 'हे' ५ ड्रायफ्रुट्स, भविष्यात कधीही चष्मा लागणार नाही

Bollywood Actor : बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या भावावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने केले वार, प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT