"सत्तेत असणाऱ्या माणसाने समस्या सोडवायच्या असतात. सत्तेत असणाऱ्यांनी समस्या मांडायच्या नसतात. अलीकडे सत्तेतील माणसं हे समस्या मांडत आहेत. त्यामुळे सत्तेत कशाला राहता. असा खोचक सवाल विरोधीपक्षनेते विजय वड्डेटीवारांनी मंत्री छगन भुजबळांना विचारला आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना छगन भुजबळांनी सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्याबाबत नाराजी व्यक्त केलीये. अंबड येथे झालेल्या सभेमध्ये देखील भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवर आगपाखड केली. जरांगे पाटलांनीही भुजबळांवर पलटवार केला. आरक्षणाच्या मुद्द्यावारून राज्यातील वातावरण पाहता विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवारांनी (Vijay Wadettiwar) सरकारवर निशाणा साधला आहे.
मेळाव्यातील भुजबळांच्या भूमिकेनंतर भुजबळांवर कुणाचा दबाव आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. यावरून पत्रकारांशी संवाद साधताना विजय वड्डेवारांनी म्हटलं की, "छगन भुजबळ यांच्यावर कोणाचा दबाव आहे की नाही हे त्यांनाच विचारा. मला याबाबत माहित नाही. दाखले देऊन झाले आहेत. त्यामुळे आता भुजबळ असू द्या किंवा जरांगे पाटील असू द्या हिमनगाच्या टोकासारखी भूमिका कशी मांडणार गावात भांडण तंटे झाले त्याला ते जबाबदार असतील. हा महाराष्ट्र पुरोगामी आहे."
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण
"डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असतात तर देशाची दोन तुकडे झाले असते, असं खळबळजनक विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी परभणीत केलं आहे. मंदिरातील दानपेटी जर काढल्या तर मंदिरातील पुजारीधीही पळून जातील असेही वादग्रस्त विधान वडेट्टीवार यांनी केले आहे.वडेट्टीवारांच्या या वक्ताव्यावरून त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका होऊ लागली. त्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरणही दिलं आहे.
भाषणामध्ये जो मुद्दा मी मांडलेला आहे तो त्यावेळी तिथे अनेक वक्त्यांनी मांडलेला होता. आजच्या परिस्थितीमध्ये जर तसं झालं असतं तर विष पेरण्याचं काम झालं असतं. दिल्लीत हिंदू मुस्लिम लढवण्याचा काम सुरू आहे. आज काय परिस्थिती असली आजच्या परिस्थितीनुसार मी ते वक्तव्य केलेले आहे. आज ही परिस्थिती राज्यकर्त्यांच्या पुढे आली असती हा त्याचा अर्थ होता, असं वड्डेटीवारांनी म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.