Beed Latest News: Saamtv
महाराष्ट्र

Beed Breaking News: धक्कादायक! राष्ट्रवादीच्या नेत्याची इंस्टाग्रामवर फेक आयडी; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Beed Latest News: लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परळी नगर परिषदेचे गटनेते तसेच धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मीक कराड यांचे फेक अकाउंट काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

विनोद जिरे

बीड, ता. १० जून २०२४

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर बीड जिल्ह्यामध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर शिरूर कासार, परळी नंतर आज वडवणी बंदची हाक देण्यात आली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याची इंस्टाग्रामवर बनावट आयडी तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे परळी नगर परिषदेचे गटनेते तसेच धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मीक कराड यांच्या नावाने इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट काढून दोन समाजात तेढ होईल अशी पोस्ट करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या विरोधात आता वाल्मिक कराड यांनी पोलिसात धाव घेतली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाल्मिक कराड यांनी पत्रक काढून ही माहिती दिली आहे. माझ्या नावाने इन्स्टाग्राम या सोशल साईटवर, अज्ञात व्यक्तीने बनावट खाते तयार करून दोन समाजात तेढ व वितुष्ट निर्माण होईल, अशा स्वरूपाची फेक पोस्ट व्हायरल केली आहे. जाणीवपूर्वक माझी बदनामी करण्याचा हा प्रकार आहे. याबाबत परळी पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडे रीतसर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे या पत्रकामध्ये म्हटले आहे.

दरम्यान याप्रकरणी सदर अज्ञात व्यक्तिविरोधात बीडच्या परळी शहर पोलीस ठाण्यात, भारतीय दंड संहितेच्या कलम 500, 505(2), तसेच आयटी ऍक्ट 66 (क) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirala Chutney Recipe : शिराळ्याची चटणी कधी खाल्ली आहात का? हिवाळ्यात जेवणासोबत तोंडी लावायला उत्तम

Pune : पुण्यात शरद पवारांना जबरी धक्का, आमदाराचा मुलगा भाजपात प्रवेश करणार, २२ नेते आज कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

SCROLL FOR NEXT