Beed APMC Election Saam Tv
महाराष्ट्र

Beed APMC Election: बीडमध्ये बाजार समिती निवडणुकीचे वातावरण तापले; आरोप प्रत्यारोपाचे वॉर सुरू...

बीड बाजार समितीच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून यामुळं आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे.

विनोद जिरे

Beed News: बीड बाजार समितीच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून यामुळं आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. आमदार संदीप क्षीरसागर हे मतदारांना आमिष दाखवून पळवा पळवी करत असल्याचा आरोप त्यांचे त्यांचे बंधू माजी नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनी केला आहे. तर आम्ही जर मतदारांना पळवले असेल, तर पोलिसात तक्रार करा असं खुलं आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी प्रतिक्रिया देत दिलं आहे. (Latest Marathi News)

बीडमध्ये (Beed) बाजार समिती निवडणूक जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यासह सर्वच पक्ष एकत्र आले आहेत. यामुळे बीड बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची बनत चालली असून आरोप प्रत्यारोपांच राजकारण सुरू झालं आहे.

तर योगेश क्षीरसागर यांच्या आरोपानंतर बीड शहरातील संतोषी माता वैष्णव पॅलेसमध्ये शेकडो मतदार आढळून आले. मात्र हे मतदार बैठकीसाठी आले होते. त्यांना कुणी डांबून किंवा थांबून ठेवलं नाही. त्यामुळं जर त्यांना वाटत असेल आम्ही मतदारांना डांबून ठेवलं आहे. तर त्यांनी पोलिसात (Police) जाऊन तक्रार करावी. अशी प्रतिक्रिया आणि खुलं आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी दिलं आहे. (Beed News)

दरम्यान माजी नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केला होता. मात्र संदीप क्षीरसागर यांनी यावर बोलणं टाळलं.यामुळं क्षीरसागर कुटुंबातील राजकारण काय रंग घेणार ? याकडं सर्वांचा लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गात महायुतीत तणावाचे संकेत, जिल्हाध्यक्षांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

EPFO चा मोठा निर्णय; पीएफ खात्यात एकही पैसा नसला तरी EDLI मधून मिळतील ५०,०००रुपये

Maharashtra Politics: काँग्रेसच्या बड्या नेत्याचा भाजप प्रवेश लांबणीवर, स्वत:च सांगितलं कारण...

मंदिरातून कधीही 'या' वस्तू घरी आणू नका; वाईट शक्ती पाठ सोडणार नाही

Thailand Bangkok Shooting : भर बाजारात अंदाधुंद गोळीबार! ६ जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःवरही झाडली गोळी

SCROLL FOR NEXT