Ashti Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Ashti Heavy Rain : बीड जिल्ह्यात धुवाधार पाऊस; कडा शहर जलमय, पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे रेस्क्यू

Beed News : आष्टी तालुक्यात सकाळपासून धुवाधार पाऊस सुरु असल्याने तालुक्यातील कडा शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात अडकलेल्यांची इंडियन आर्मीची टीमच्या मदतीने हेलिकॉप्टरमधून रेस्क्यू करण्यात येत आहे

Rajesh Sonwane

योगेश काशीद 

बीड : बीड जिल्ह्यात मध्यरात्री ढगफुटीजन्य पाऊस झाला आहे. या पावसाचा फटका शेती पिकांसह शेतकऱ्यांवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर आष्टी तालुक्यातील कडा व आष्टी पाटोदा शिरूर या भागामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळाला असून या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर कडा शहर जलमय झाले असून शहरात पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकले असून या नागरिकांना रेक्स्यु करून सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. 

बीडच्या आष्टी तालुक्यात ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे अनेक गावं पाण्याच्या पुरामध्ये अडकली आहेत. बीड जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून अनेकजण पुराच्या पाण्यात अडकले आहेत. दरम्यान आष्टी तालुक्यातील कडा शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून घरांमध्ये पाणी शिरले आहे. पाऊस सुरूच असल्याने घराघरात भीतीचं सावट निर्माण झाले असून आई- बापांच्या डोळ्यात काळजी पाहण्यास मिळत आहे. 

हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रेस्क्यू 

आष्टी मतदार संघातील कडा येथील पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांचे हेलिकॉप्टरच्या साह्याने आमदार सुरेश धस यांच्या मागणीनंतर रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे. नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात येत असून त्यांना सुरक्षित स्थळी नेले जात आहे. दरम्यान पावसाचा जोर कायम असल्याने पूरस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

नदीच्या पुरात एकजण गेला वाहून 

बीड जिल्ह्यामध्ये सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी नदीच्या पुरामध्ये एक व्यक्ती वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आला. तर काही ठिकाणी जनावर त्याचबरोबर झाड वाहून गेल्याचे पाहायला मिळालेला आहे. यातच संपूर्ण कडा शहर हे जलमय झालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Gochar 2025: राहूच्या नक्षत्रात आज होणार बुध ग्रहाचं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी

Maharashtra Live News Update : निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी - सुत्र

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

Crime News: नवऱ्याला चारित्र्याचा संशय; वाट अडवून भररस्त्यात बायकोसोबत केलं भयानक कृत्य

Nilesh Ghaywal illegal property : घायवळच्या घरावर पोलिसांची धाड, कोण आहे घायवळचा आका? VIDEO

SCROLL FOR NEXT