Walmik Karad  saam tv
महाराष्ट्र

Beed Ash Mafia: बीडच्या राख माफियांना दणका; वाल्मिक कराडच्या साम्राज्याची 'राख'

Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडच्या साम्राज्य बेचिराख करण्यास सुरुवात झालीय. परळीत नेमकं काय घडलंय? कराडचं काळं साम्राज्य कसं नष्ट होणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Mohalkar

गँग्ज ऑफ वासेपूरच्या धनबादमध्ये कोळशातून गुन्हेगारी जन्माला आली. तर त्याच कोळशाच्या राखेतून वाल्मिक कराडची गँग्ज ऑफ परळी जन्माला आली. माफियांचं काळं साम्राज्य उभं राहिलं. मात्र आता परळीच्या औष्णिक विद्यूत केंद्राने वाल्मिक कराडच्या सत्तेला सुरुंग लावलाय. निविदा असलेल्याच कंपन्यांना आता परळीच्या दाऊतपूर तलावातून राख उपसण्याची परवानगी देण्यात आलीय.

राख, राखेतून पैसा, पैशातून सत्ता मिळवत कराडने खंडणी, खून, मारामाऱ्या करुन काळं साम्राज्य उभं केलं. मात्र आता 16 निविदाधारक कंपन्यांच्या माध्यमातून पोलीस बंदोबस्तात राखेच्या वाहतूकीची परवानगी मान्यता दिलीय. मात्र या राखेचं काळं अर्थकारण नेमकं कसं आहे? पाहूयात.

परळीच्या राखेचं काळं अर्थकारण

परळी औष्णिक विद्यूत केंद्रातून 600-700 ट्रक राखेची अवैध वाहतूक

एक ट्रक राखेला 18 ते 20 हजारांचा भाव

दररोज 1 ते सव्वा कोटींच्या राखेची विक्री

महिनाभरात 36 कोटी तर वर्षभरात 450 कोटींची कमाई

52 वर्षांपासून राख माफियांकडून वाहतूक

अनेक वर्षांपासून राखेचं अधिकृत कंत्राट नाही

परळीत राख माफियांना लगाम घालण्याच्या निर्णयाचं स्वागत करतानाच आमदार सुरेश धसांनी पोलिसांकडे बोट दाखवलंय.राखेतून फिनिक्स पक्ष भरारी घेतो. मात्र बीडमध्ये वाल्मिक कराडने राखेतून काळ्या कारनाम्यांचं साम्राज्य उभं केलं. मात्र औष्णिक विद्यूत केंद्र आणि पोलीसांच्या दुर्लक्षामुळेच कराडसारखे हैवान गब्बर झाले. मात्र आता पोलीसांनी घेतलेली भूमिका कायम राहणार की पुन्हा नव्या हैवानांच्या काळ्या कारनाम्यांमुळे बीडची राख होणार का ? हेच पाहायचं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

SCROLL FOR NEXT