बीड - जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फ बोर्डच्या जमिनी, महसूल मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने, काही पांढरपेशींसह इतरांनी आपल्या घशात घातल्या आहेत. याच घोटाळ्याचा गेल्या अनेक दिवसांपासून, सामटिव्ही पाठपुरावा करत आहे. त्यामुळे एक - एक नवनवीन घोटाळा आणि प्रकरण समोर येत आहे. आज पुन्हा एकदा सामटिव्हीच्या दणका पाहायला मिळालाय, बीडच्या (Beed) ग्रामीण पोलीस (Police) ठाण्यामध्ये, आणखी एक गुन्हा दाखल झाला असून महसूलमधील तत्कालीन बडतर्फ अधिकारी एन.आर.शेळकेसह मंडळाधिकारी, तलाठी व इतर 5 जणांचा या गुन्ह्यात समावेश आहे.
हे देखील पहा -
बीड जिल्ह्यात वक्फ बोर्डाच्या जमीनी मोठ्या प्रमाणावर असून घोटाळेबाज भूमाफियांनी, त्या महसुल प्रशासन आणि मुतवल्ली यांच्याशी मिलीभगत करत, जमिनी हडप केल्या आहेत. बीड शहरातील सारंगपूरा मस्जिदीच्या नावे असलेल्या 25 एकर 38 गुंठे जमिनीला इनामदार रोशनअली यांनी, 99 वर्षांची लिज केल्याचे दाखवत, दिनकर गिराम यांच्या नावे फेरफार घेण्यात आला होता. सदर फेरफार रद्द करुन वक्फ बोर्डाला ताबा द्यावा, अशी वक्फ बोर्डाने अनेकदा विनंती करुन देखील ते फेरफार रद्द झाले नाहीत.उलट तत्कालीन उपजिल्हाधिकारी एन.आर.शेळके याने बेकायदेशीरपणे सदर जमिन खाजगी व्यक्तींच्या नावे खालसा केली.
या प्रकरणात आता बडतर्फ करण्यात आलेला उपजिल्हाधिकारी एन.आर.शेळके याच्यासह मंडळाधिकारी पी.के.राख, तलाठी तांदळेसह भूमाफिया अशोक पिंगळे, श्रीमंत मस्के, सखाराम मस्के, सर्जेराव हाडूळे, उध्दव धपाटे, यांचा समावेश आहे. दरम्यान या सर्व आरोपींवर बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 420, 406, 471, 448, 120-B, 409, 34, 468, 52(A) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.दरम्यान बीड जिल्ह्यातील देवस्थान आणि वक्फ बोर्डच्या जमिनी हडपलेल्या घोटाळेबाजांची कडी, हळूहळू मोठी होत चालली असून यामुळे घोटाळेबाजाचे धाबे दणाणले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.