Beed : नववधूने लग्नमंडपातच दिली ऑनलाईन परीक्षा!  SaamTV News
महाराष्ट्र

Beed : नववधूने लग्नमंडपातच दिली ऑनलाईन परीक्षा!

विवाहाच्या दिवशीच योगायोगाने नववधू असणाऱ्या सरिताची परीक्षा होती.

विनोद जिरे

बीड : 'विद्येविना मती गेली.. मतिविना नीती गेली.. नीतिविना गती गेली.. गतिविना वित्त गेले.. वित्ताविना शूद्र खचले.. इतके अनर्थ एका अविद्येने केले' अशी शिकवण देत महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीमाईच्या माध्यमातून, स्त्रीयांना शिक्षण देत महिलांना खरं स्वातंत्र्य आणि अधिकार मिळवून दिले. आज त्याच स्वातंत्र्याची आणि अधिकाराची प्रचिती बीड जिल्ह्यात समोर आली. एका नववधूने (Bride) आयुष्याच्या दोन्ही परीक्षा, एकाच मंडपात दिल्या. त्यामुळं ऐन लगीन घाईत, लग्नमंडपातचं दिलेल्या परीक्षेने, आता या नववधूची चांगलीच चर्चा रंगलीय.

हे देखील पाहा :

बीडच्या (Beed) अंबाजोगाईमध्ये (Ambajogai) एमबीएचं शिक्षण घेणाऱ्या सरिता काळे आणि वैभव सुर्यवंशी यांचा शुभविवाह पार पडला. तर, या विवाहाच्या दिवशीच योगायोगाने नववधू असणाऱ्या सरिताची परीक्षा होती. यादरम्यान दुपारी साडेबारा वाजता डोक्यावर अक्षता पडला, लग्न लागले आणि बरोबर एक वाजता नववधू असणाऱ्या सरिताने शिक्षणाचा हक्क बजावत, तिथेच लॅपटॉप उघडला आणि दोन तास ऑनलाइन परीक्षा (Online Exam) दिली.

मुळच्या अंबाजोगाई तालुक्यातील सांगाव गावच्या, अत्यंत सर्वसामान्य कुटुंबात सरिता यांचा जन्म झाला. या सामान्य कुटुंबातून सरिता काळे या जिद्दीने पुढे येत, सावित्रीबाई फुले विद्यापीठातून (SPPU) एमबीएच्या द्वितीय वर्षांमध्ये शिकत आहेत. त्यात सध्या महाविद्यालयातील परीक्षांचा (Exams) काळ चालू आहे आणि त्यातच सरिताचं लग्न जमलं. विशेष म्हणजे ज्या दिवशी लग्नाचा मुहूर्त निघाला त्याच दिवशी वधू होणाऱ्या सरिताचा ऑनलाइन परीक्षेचा पेपर होता.

मग काय लगीन घाई सुरू झाली. अंबाजोगाई शहरातील पांडुरंग मंगल कार्यालयात सरिताचा विवाह ठरला. साडेबाराचे मुहूर्त ठरले. अन विवाह सोहळा (Marriage) पार पडला. डोक्यावर अक्षता पडल्या. नववधूने वराला वरमाला घातली. तोपर्यंत ते सगळे सोपस्कर आणि विधीवत पार पडले. मात्र, एक वाजताच नववधूने सोबत आणलेला लॅपटॉप (Laptop) उघडला आणि ऑनलाइन परीक्षा द्यायला सुरुवात केली. यादरम्यान डोक्यावरचा अक्षता आणखी डोक्यावरच होता. गळ्यामध्ये घातलेली वरमाला सुद्धा गळ्यातच होती. आजूबाजूला सगळा गोंधळ कानावर पडत होता, मात्र तरीही थोडं सुद्धा न डगमगता सरिताने लॅपटॉप वरून, ऑनलाइन परीक्षा दिली.

दरम्यान, प्रत्येकाच्या आयुष्यातील सगळ्यात अनमोल क्षण म्हणजे लग्न असतं. मात्र, या लग्न सोहळ्यात सुद्धा स्वतःच्या करिअरकडे थोडंसुद्धा दुर्लक्ष न करता सरिताने आपली परीक्षा दिल्याने, आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी देखील हे पाहून दाद दिली. दरम्यान लगीन घाईत आयुष्याच्या दोन्ही परीक्षा एकाच मंडपात देणाऱ्या नववधूची बीड जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगू लागलीय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

Bhakri Making Tips : भाकरी थापताना तुटते? टेन्शन घेऊ नका, फक्त 'या' सोप्या टिप्स वापरा

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट, 2100 नाहीतर 4500 मिळणार|VIDEO

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Anushka Sharma Looks Like: 'वहिनीपेक्षा ही क्युट...'; पाकिस्तानी तरुणी दिसते सेम अनुष्कासारखी, व्हिडिओ पाहून विराटला केलं टॅग

SCROLL FOR NEXT