Ambajogai Goverment Hospital Saam tv
महाराष्ट्र

Ambajogai Goverment Hospital: बीडच्या स्वाराती रुग्णालय औषधांचा तुटवडा; रुग्णांना बाहेरून आणावी लागतेय औषधी

Beed News : मागील एक वर्षापासून कुठल्याही साहित्याचा पुरवठा नसल्यामुळे रुग्णांवर प्रभावी उपचार होत नाहीत

विनोद जिरे

बीड : मागील महिना- दीड महिन्यापूर्वीपासून शासकीय रुग्णालयात औषधींचा तुटवडा जाणवत आला आहे. यात आता बीडच्या (Ambajogai) अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकिय रुग्णालयात (Hospital) औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे येथील रुग्णांना वेळेवर औषधी उपलब्ध होत नसल्याने त्यांना बाहेर जावे लागत आहे. (Live Marathi News)

औषधींचा तुटवडा जाणवत असल्याने नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णांना जीव गमवावा लागल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. यानंतर काही दिवस औषधी पुरवठा चांगला झाला. मात्र आता बीड जिल्ह्यात औषधींचा तुटवडा जाणवू लागला आहे. रुग्णांना वेळेवर औषधी, गोळ्या मिळत नसल्यामुळे गैरसोय होत आहे. त्यामुळे तात्काळ गोळ्या औषध उपलब्ध करून द्यावी; अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्षभरापासून समस्या 
स्वाराती रुग्णालयात सर्वसामान्य रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधी लिहून देतात. मात्र औषध वाटप विभागात औषधांचा साठा संपल्याने रुग्णांना स्वतःच्या पैशाने औषधी घ्यावी लागतात. या विभागात मागील एक वर्षापासून कुठल्याही साहित्याचा पुरवठा नसल्यामुळे रुग्णांवर प्रभावी उपचार होत नाहीत. विशेतः दंत विभागात औषधी, गोळ्या व इंजेक्शन काहीच उपलब्ध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

SCROLL FOR NEXT