Unseasonal Rain Saam tv
महाराष्ट्र

Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा तडाखा; बीड, नगरमध्ये ज्वारी, कापसासह पिकांचे मोठे नुकसान

Beed Ahmednagar News : राज्यातील अनेक भागात रविवारी दुपारपासून पावसाळा सुरवात झाली. यात बीड व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे

Rajesh Sonwane

सुशील थोरात/ विनोद जिरे 
बीड
: दुष्काळाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांपुढे पुन्हा एकदा अवकाळी ने संकट उभे राहिले आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्याने ज्वारी, कापसासह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील अनेक भागात रविवारी दुपारपासून पावसाळा सुरवात झाली. यात बीड व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (Latest Marathi News)

ज्वारी भुईसपाट 

मध्यरात्री बीडसह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसला. यामध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये जगवलेली ज्वारी भुईसपाट झाली आहे. तर कापसासह अन्य पिकांचे देखील नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढे दुष्काळापाठोपाठ आता अवकाळीचे देखील संकट उभे राहिले आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी; अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पारनेर तालुक्यात अवकाळीचा धुमाकूळ

अहमदनगर : जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. नगर आणि पारनेर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले असून कांदा पीक संपूर्णपणे झोपून गेले आहे. तर पपई, द्राक्ष बागा गरांमुळे झाडून गेल्या आहेत. तर कुक्कुट पालन करणाऱ्या शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले असून अनेक छोटी छोटी पिल्ले गारांच्या मारामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लाख रुपयांचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा  पंचनामा त्वरित करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी  मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Crop : धुक्यामुळे कांदा पिक धोक्यात; रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल

VBA News : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध! पाहा नेमकं काय आहे जाहीरनाम्यात | Video

Sneeze: शिंकताना डोळे का बंद होतात? जाणून घ्या एका क्लिकवर

Crime News : ३-३ गर्लफ्रेंड, महागडं गिफ्ट द्यायचं होतं; पठ्ठ्या थेट बँक लुटायला गेला, पण सगळा घोळ झाला!

Maharashtra News Live Updates: बारामतीत भाजपला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT