Beed Crime विनोद जिरे
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला दंडासह 10 वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा

विनोद जिरे

बीड: बीडच्या (Beed) केज तालुक्यातील अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेवून, तिच्यावर वारंवार बलात्कार (sexual assualt) केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी केज पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने (court) सदर साक्षीपुरावा आणि सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून, संबंधीत आरोपीस (Accused) दंडासह १० वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. बीडच्या (Beed) अंबाजोगाईमधील (Ambajogai) अप्पर सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती एस.एस.सापटणेकर यांनी ठोठावला आहे. (Beed accused sentenced 10 years hard labor torturing minor girl)

हे देखील पहा-

आरोपी अशोक मारुती सरवदे , रा.साबळा, ता . केज याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले होते. त्यानंतर सदर आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानुसार आरोपीस सदरचे प्रकरणात न्यायालयाने जामीन दिला होता. मात्र, जामीनवर सुटल्यानंतर देखील आरोपी सरवदे याने पुन्हा पिडीतेस फोन (Phone) करून लग्नाचे (marriage) आमिष दाखवून पळवून नेले होते. ती अल्पवयीन आहे, हे माहीत असतांना देखील, नवरा- बायको सारखे राहून तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला आहे.

विशेष बाब म्हणजे सदर आरोपी हा विवाहीत असून त्याला २ मुले आहेत. तरीदेखील सदर अल्पवयीन पिडीतेस केज तालुक्यातील साबळा येथून पळवून नेले आणि अनेकवेळा बलात्कार केला आहे. अशा स्वरूपाच्या फिर्यादीवरून दि. 28 सप्टेंबर 2020 रोजी केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. 405/ 2020 कलम 363 , 376 , 376 (J) (n) भा.द.वी सहकलम 4, 6,8,10 बा. लैं. अ. प्र. का. अन्वये गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान हे प्रकरण आरोपीस तुरूंगात ठेवूनच चालविण्यात आले आहे. दरम्यान न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

PM Vishwakarma Yojana: वर्षभरात ६ लाख लाभार्थी, २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी केलेय रजिस्ट्रेशन, योजनेचा कसा घ्याल लाभ?

SCROLL FOR NEXT