Beed Accident Saam TV News
महाराष्ट्र

Beed Accident: बीडमध्ये कंटेनरने ६ जणांना चिरडलं, अपघात नेमका कसा झाला? समोर आलं कारण

Beed Accident Reason: बीडमध्ये ६ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या कंटेनरचा अपघात नेमका कसा झाला यामागचे खरं कारण समोर आले आहे. अपघाताची ही घटना सोमवारी रात्री घडली होती. कंटेनरने ९ जणांना चिरडलं होतं. यामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला होता.

Priya More

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये भरधाव कंटेनरने ९ जणांना चिरडलं होतं. या अपघातामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर तिघे जण जखमी झाले होते. जखमींमधील दोघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात नेमका कसा झाला होता याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सहा जणांच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या कंटेनरचा अहवाल आरटीओकडून सादर करण्यात आला आहे. चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात आलं आहे.

आरटीओने दिलेल्या अहवालानुसार, टेम्पोचा वेग तासी १०० किमी असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. उतारावर पाणी साचल्याने टेम्पो चालकाला कंटेनर नियंत्रणात आणता आला नसल्याचंही स्पष्ट करण्यात आले आहे. या अपघातामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली होती.

बीडमधील धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ६ जणांच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या कंटेनरचा अहवाल आरटीओ विभागाने सादर केला. या टेम्पोची पाहणी आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. टेम्पोचा वेग तासी १०० किमी असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. उतारावर पाणी साचल्याने टेम्पो चालकाला कंटेनर नियंत्रणात आणता आला नसल्याचंही स्पष्ट करण्यात आले आहे.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर पाणी साचते होते. त्यामुळे कार सुरूवातीला दुभाजकावर धडकली होती. याच कारला बाजूला काढण्यासाठी काही तरुण गेले होते. याच वेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरने ९ जणांना चिरडले होते. या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर तिघे जण जखमी झाले होते.

महामार्गावर वाहनांना ८० किलोमीटर वेगाची मर्यादा आहे. मात्र पुलावर उतार असल्याने टेम्पोची स्पीड १०० होती. उतारावर पाणी साचल्याने चालकाला कंटेनर नियंत्रणात आणता आला नाही. पावसामुळे दृश्यमानता कमी होती आणि यातच कंटेनर चालकाने ९ जणांना धडक दिली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला, असं आरटीओ अधिकाऱ्यांनी अहवालात म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

सिद्धिविनायकची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा

SCROLL FOR NEXT