Beed Accident SAAM TV
महाराष्ट्र

Beed Accident: भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक, चाकाखाली चिरडून २ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

2 Youth Died In Beed Accident: बीडमध्ये भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीवरून प्रवास करणारे ३ तरुण गंभीर जखमी झाले. यामधील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Priya More
  • बीडमध्ये भीषण रस्ते अपघात

  • टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक

  • अपघातामध्ये दुचाकीवरील दोन तरुणाचा मृत्यू

  • एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत

योगेश काशिद, बीड

बीडमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. बीडच्या कन्हेरवाडी घाटात ही घटना घडली. भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. टेम्पोच्या चाकाखाली चिरडून दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातामध्ये दुचाकीला धडक दिल्यानंतर टेम्पो रस्त्यावर उलटला. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कन्हेरवाडी घाटात भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरील दोन तरुण दूरवर फेकले गेले. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणांचा जास्त रस्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत दोन जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी सांगितले की, मंगळवार रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शहरातील सावतामाळी नगर भागात राहणारे गणेश मुरुळे, गणेश खोले आणि मुंजा मिसाळ हे ३ तरुण दुचाकीवरून प्रवासकरत होते. कामानिमित्त ते अंबाजोगाईकडे जात असताना भयंकर घडलं. कन्हेरवाडी घाटात हॉटेल नंदनवनजवळ त्यांच्या दुचाकीला एका टेम्पोने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात गणेश मुरुळे, मुंजा मिसाळ आणि गणेश खोले हे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना परळी वैजनाथ येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले.

पण डॉक्टरांनी तपासून गणेश मुरुळे, मुंजा मिसाळ यांना मृत घोषित केले. या अपघातामध्ये गणेश खोले हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याअपघाताचा तपास अंबाजोगाई पोलिस करत आहे. या तरुणाच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

Chunyache Pani: १५ दिवस चुन्याचे पाणी प्यायल्याने काय होते?

SCROLL FOR NEXT