Beed Car Accident Saam TV
महाराष्ट्र

भयंकर घटना! वाहनाची हवा चेक करायला खाली उतरले, अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं

भरधाव वेगात येणाऱ्या कारने ट्रकचालक आणि क्लिनरला चिरडलं

विनोद जिरे

बीड : अंबाजोगाई महामार्गावर भरधाव कारने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या दोघांना चिरडलंय. ही दुर्दैवी घटना बीड अंबाजोगाई महामार्गावरील चंदन सावरगाव येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथील बसस्थानकावर, रात्री 8 ते 9 च्या दरम्यान राजस्थान येथील ट्रक चंदनसावरगाव येथील बस स्टँडवर रस्त्याच्या कडेला थांबला होता. (Beed Accident News)

ट्रक चालक व क्लिनर हे खाली उतरून ट्रकच्या टायर मधील हवा तपासून पाहत होते. या दरम्यान अंबाजोगाईकडून केजकडे येत असलेली भरधाव कारने त्या दोघांना चिरडले. या अपघातात उत्तर भारतीय ताहेर हुसेन आणि इस्माईल हे दोघे ट्रक चालक व क्लिनर जागीच ठार झाले. (Beed Crime News)

दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, कार ट्रक चालक व क्लिनरला चिरडून नंतर रस्त्याच्या कडेच्या खड्ड्यात पडली. यामध्ये कारमधील प्रदीप अर्जुन मुंडे आणि रवि दिलीप मुंडे दोघे रा. गोपाळपूर ता. धारूर हे जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat-Anushka: विराट आणि अनुष्काचे अनसीन रोमँटिक फोटो पाहिलेत का?

Shocking: भाजप महिला नेत्याच्या घरी सेक्स रॅकेट, ९ तरुणींना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं

Maharashtra Nagar Parishad Live : अहिल्यानगरमध्ये मतदान केंद्रावर अद्यापही लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील पांगरा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

Dr Ambedkar Favourite Cafe: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबईतला आवडता कॅफे कोणता होता?

SCROLL FOR NEXT