Beed Accident  
महाराष्ट्र

Beed Accident : बीडमध्ये १५ मिनिटांत २ भीषण अपघात, कारने दोन-तीन पलट्या खाल्ल्या; २ महिन्याच्या मुलीचा हात तुटला

Beed Accident : बीड - महामार्ग प्राधिकरणाच्या गलथानपणामुळे टोल नाक्यावर दोन अपघात झाले आहेत. यामध्ये २ महिन्याच्या मुलीचा हात तुटला आहे.

Namdeo Kumbhar

Beed Accident : बीड - महामार्ग प्राधिकरणाच्या गलथानपणामुळे टोल नाक्यावर दोन अपघात झाले आहेत.यामध्ये सात जण जखमी झाले आहेत. यामध्ये दोन महिन्याच्या मुलीचाही समावेश आहे. त्या मुलीचा हात तुटल्याचं समोर आले आहे.

बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदपूर -अहमदनगर-राष्ट्रीय महामार्गावरील केज परिसरातील टोल नाक्यावर, रस्त्यावर टाकलेला मातीचा ढिगारा आणि सिमेंट काँक्रिटच्या अवशेषांच्या ढिगाऱ्याला धडकून कारचा भीषण अपघात झालाय. अपघातात कारने दोन-तीन पलट्या खाल्ल्या आहेत. यात २ महिन्याच्या मुलीचा हात तुटला आहे. तर चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मुलीची आई, पाच वर्षाची मुलगी, आज्जी, मुलीचा चुलता हे गाडीतील सहाजण जखमी झाले आहे.

याच ठिकाणी टोल नाक्याच्या दुसऱ्या बाजूला अपघातातनंतर पंधरा मिनिटाच्या अंतराने दुसरा अपघात झालाय. त्यात चालक जखमी झाला आहे. टोल नाक्याचे काम सुरू असताना महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदाराने कुठलेही फलक रेडियम किंवा पर्याय रस्ता वळण रस्ता असे काहीच उपाययोजना न केल्याने त्या अपघात झाले आहेत. त्यामुळे संबंधित गुत्तेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे.

अपघातानंतर टोलनाक्यावर गर्दी जमली होती. अपघाताची माहिती मिळतच पोलिसांनीही घटना स्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. दोन्ही अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आलेय. आता जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन महिन्याच्या मुलीची प्रकृती अतिशय नाजूक असल्याचेही समोर आलेय. त्या मुलीवर उपचार सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election 2024 : राज्यात एकूण ५९.६९ टक्के मतदान; कोणत्या जिल्ह्यात किती मतदान झालं? VIDEO

Jharkhand Exit Poll : झारखंडमध्ये कुणाची सत्ता? कुणाला किती जागा मिळणार?

Maharashtra Exit Poll News : महाराष्ट्रात कोणाची सत्ता, महायुती की मविआ? पाहा Video

VIDEO : मतदानाच्या दिवशी पोलिसांकडून उमेदवाराच्या हातात बेड्या, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Hardik Pandya : हार्दिक पांड्या पुन्हा T20 चा नंबर-1 अष्टपैलू खेळाडू, टिळक वर्माची फलंदाजीत गरूड झेप

SCROLL FOR NEXT