परळीतील तहसिलदाराला लाच घेताना एसीबीने पकडले
शेतकऱ्याकडून सोलंसी प्रमाणपत्रासाठी लाच मागितल्याचा आरोप
एसीबीने लाच घेताना रंगेहाथ पकडलं
एसीबीकडून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली
बीडमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. शेतकऱ्याकडून लाच घेताना तहसीलदाराला एसीबीने रंगेहाथ पकडलं. बीडच्या परळीतील तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई केली. काही वेळापूर्वी त्यांना लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. एसीबीच्या या कारवाईमुळे बीडमध्ये खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, परळी येथील वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. शेतकऱ्याकडून ५० हजारांची लाच घेताना त्यांना एसीबीने पकडले. तक्रारदाराकडून सोलंसी (ऐपतीचे) प्रमाणपत्र देण्यासाठी २० हजार रुपयांची तहसीलदारांकडून मागणी करण्यात आल्याची तक्रार बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांना लाच घेताना पकडण्यात आले. तक्रारदाराकडून सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र तडजोडीनंतर २० हजार रुपयांवर सौदा ठरल्याची माहिती समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पथकाने पडताळणी करून सापळा रचला. दरम्यान तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्यानंतर तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येत आहे.
तरीही एसीबीने आवश्यक पुरावे संकलित करत पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे परळी तालुक्यातील महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यातही या कारवाईची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. संबंधित अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास बीड एसीबीकडून केला जात आहे. भ्रष्टाचाराविरोधातील या कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून प्रशासनातील पारदर्शकतेसाठी अशा कठोर कारवाया आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.