Chandrapur News Saam Digital
महाराष्ट्र

Chandrapur News: चंद्रपूर शहरात कॅमेरे अन् पिंजरे, नागरिकांमध्ये दहशत, प्रशासनाचीही उडालेय झोप? नेमकं कारण काय?

Chandrapur News Update: सध्या चंद्रपूर शहरातील घनदाट भागात अनेक कॅमेर आणि पिंजरे बसवण्यात आले आहेत. नागरिकांध्ये दहशतीचं वातावरण पसरलं तर आहेच प्रशासनाचीही झोप उडाली आहे.

Sandeep Gawade

Chandrapur News

सध्या चंद्रपूर शहरातील घनदाट भागात अनेक कॅमेर आणि पिंजरे बसवण्यात आले आहेत. नागरिकांध्ये दहशतीचं वातावरण पसरलं तर आहेच प्रशासनाचीही झोप उडाली आहे. घनदाट जंगल व लोकवस्तीच्यामधून गेलेला रेल्वे मार्ग व त्यालगत असलेली बोराची झाडे या सर्व घटनेला कारणीभूत ठरलेत. यातल्या बोराच्या झाडांचा मोह आवरला नाही आणि एका हिंस्र प्राण्याने चंद्रपुरात प्रवेश केला. या हिंस्र प्राण्यामुळे नागरिकांची एकच घाबरगुंडी उडाली. हा प्राणी अस्वल असल्याची शंका आहे कारण बोरं तर त्यालाच आवडतात.

अचानक झालेल्या अस्वलाच्या हल्ल्यानंतर वनविभाग सतर्क झालं असून वनविभागाच्या बचाव पथकाने आज या परिसराची पाहणी केली. ज्या जंगल भागातून अस्वलाने प्रवेश केल्याची शंका आहे, त्या भागात कॅमेरे आणि पिंजरे लावण्यात आले आहेत. चंद्रपूर शहराच्या घनदाट लोकवस्तीच्या भिवापूर सुपर मार्केट परिसरात अस्वलीचा धुमाकूळ बघायला मिळाला होता. लालपेठ भागातील जंगल परिसराला लागून असलेल्या रेल्वे ट्रॅक भागातून अस्वलीने या भागात प्रवेश केला. अचानक पुढ्यात आलेल्या अस्वलीमुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर एका चिकन शॉपमध्ये पळापळ करत शिरलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत शटर बंद केल्याने हल्ल्यातून नागरिक बचावले.

लालपेठ कोळसा खाणीच्या क्षेत्रातून राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागच्या जंगलात या अस्वलीने प्रवेश केला असावा, अशी शक्यता आहे. त्यामुळेच आज सकाळपासून या भागात वनविभागाचं पथक गस्त घालत आहे. घनदाट लोकवस्तीत शिरलेल्या अस्वलामुळे मात्र परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या भागातून लोकवस्तीच्या मधून गेलेला रेल्वे मार्ग व त्यालगत असलेले अस्वलीचे आवडते खाद्य बोराची झाडे असल्यामुळे या भागात अस्वलं आकर्षित होतात, असं वनविभागाचं मत आहे. तसेच या भागात असलेल्या खाजगी व शासकीय जमिनीवरील झुडपी जंगलामुळे अस्वलाला आश्रयस्थान मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care: सतत थकवा, अशक्तपणा आणि श्वास घेण्यास त्रास होतोय? मग शरीरात असू शकते ‘ही’ कमतरता; वेळीच व्हा सावधान

Badlapur News: नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा; राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये हमरी-तुमरी

Maharashtra News Live Update: नारा नदी पुलाखाली आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

Cucumber Benefits: उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने शरीराला होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

२ तासांपूर्वी मित्रांसोबत फोटो काढला, स्टेटसला ठेवला; पण त्यांनीच केली हत्या, संभाजीनगरात खळबळ

SCROLL FOR NEXT