Beed Car-Tempo Accident News विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed Car Accident | भयंकर अपघात! टेम्पोने कारला चिरडलं; एकाच कुटुंबातील ६ जण जागीच ठार

Beed Car-Tempo Accident News | या अपघातात कुटे नामक एकाच कुटुंबातील 6 जण जागीच ठार झाले आहेत.

विनोद जिरे

बीड: बीडच्या (Beed) पाटोदा - मांजरसूंबा रोडवरील पाटोद्याजवळ असणाऱ्या बामदळे वस्ती येथे, स्विफ्ट डिझायर कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात (Car Accident) झाला आहे. या अपघातात कुटे नामक एकाच कुटुंबातील 6 जण जागीच ठार झाले आहेत. घटनास्थळी पाटोदा पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते दाखल झाले असून अपघातातील व्यक्तींना बाहेर काढले आहे. (Beed Car-Tempo Accident)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, कुटे कुटुंबिय हे पुणे येथून आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथे जात होते. मात्र, पाटोदा शहराजवळील बामदळे वस्ती येथे सकाळी सात वाजेच्या सुमारार आयशर टेम्पो आणि त्यांच्या स्विफ्ट कारचा अपघात झाला. अपघातात टेम्पो थेट कारच्यावर चढल्याने कार पुर्णपणे दाबली गेली. हा अपघात एवढा भीषण होता, की आयशर टेम्पोच्या खाली स्विफ्ट कार घुसल्याने आणि कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामुळे कारमध्ये बसलेल्या कुटे कुंटुंबियातील सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

टेम्पोखाली अडकलेली स्विफ्ट कार काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. गाडीमधील व्यक्तींचा अक्षरशः शरीराचा चंदामेंदा झालेला होता. घटनास्थळी पाटोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस हजर झाले होते, या सर्वांनी मिळून गाडीबाहेर मृतदेह काढण्यास मदत केली. या अपघाताचा पुढील तपास केला जात आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT