Bacchu kAdu Saam TV
महाराष्ट्र

Bacchu Kadu: पहिली वेळ आहे म्हणून माफ करतो, पण पुन्हा वाट्याला जाल तर... बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा

प्रहार आंडूपांडूचा पक्ष नाही. आम्ही रक्ताचं पाणी केलं ते राजकारणासाठी नाही केलं.

साम टिव्ही ब्युरो

अमरावती : रवी राणा यांनी आपले शब्द मागे घेतल्यानंतर बच्चू कडू  (Bachhu Kadu)  यांनीही नरमाईची भूमिका घेतली. मात्र प्रहारच्या मेळाव्यात आमदार बच्चू कडू यांनी आपल्या स्टाईलमध्ये त्यांच्या विरोधकांना इशारा झाला. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही, पण आमच्या मागे कोण लागलं तर त्यांना सोडत नाही, असा बच्चू कडू यांनी म्हटलं.

आमदार रवी राणा यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपांवर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, राणा यांची पहिली वेळ आहे म्हणून त्यांना माफ करतो. मात्र पुन्हा आमच्या वाट्याला गेले तर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील बच्चू कडून यांनी दिला (Latest News)

प्रहार आंडूपांडूचा पक्ष नाही. आम्ही रक्ताचं पाणी केलं ते राजकारणासाठी नाही केलं. दिव्यांगासाठी आम्ही काम केलं. एकानेही त्यांच्यासाठी विधानसभेत आवाज उठवला नाही. ते काम आम्ही केलं. आम्ही उगाच गुवाहाटीला गेलो नाही. मंत्री होतोच की, मग शिंदे गटासोबत जाण्याची गरज काय होती. परंतु सत्ता वंचित घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सत्तेसोबत जावं लागलं, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.

सत्ता गेली चुलीत

गेली 20 वर्ष 350 गुन्हे घेऊन फिरतोय. सत्ता गेली चुलीत. बच्चू कडू स्वत: निवडणूक लढतो, कुणाच्या इशाऱ्यावर लढत नाही. प्रहार ही केवळ सेवेच्या जोरावर उभी आहे. मात्र आमच्यावर चुकीचे आरोप होत असतील तर ते सहन होणार नाहीत.

आम्ही कोणत्या पक्षाचा नव्हे तर विचारांचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे आमच्यापासून सावध राहा. आम्ही सरकारमध्ये जरी असलो तरी, सहन झालं नाही तर सोडून जाऊ पण तुम्हाला सोडणार नसल्याचेही यावेळी ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SAIL Recruitment: स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी; महिन्याला १.६० लाखांचं पॅकेज; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update : महिलांच्या खात्यात १०,००० जमा करा- उद्धव ठाकरेंची मागणी

Shubman Gill vs Rohit Sharma : कॅप्टन शुभमन गिलचं विक्रमी शतक; रोहित शर्माच्या वर्चस्वाला सुरुंग

SBI Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार स्टेट बँकेत नोकरी; पगार ९३,९६० रुपये; अर्ज कसा करावा?

ED Raids : ईडीची रिलायन्सवर मोठी कारवाई, अंबानींच्या विश्वासूला ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT