गरिबांची मुलगी गेली तर पळाली,श्रीमंतांची गेली तर 'लव्ह मॅरेज'; बच्चू कडू विरोधकांवर कडाडले

'गरिबांची मुलगी गेली तर पळाली,श्रीमंतांची गेली तर लव्ह मॅरेज', अशा शब्दात बच्चू कडू बंडखोर आमदारांवर टीका करणाऱ्या विरोधकांवर जोरदार टीका केली.
bacchu kadu
bacchu kaduSaam tv
Published On

अमर घटारे

Bacchu kadu News : अमरावतीत आज आमदार बच्चू कडू यानी प्रहार संघटनेच्या मेळाव्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. आमदार रवी राणा यांच्यासबोत झालेल्या वादासंदर्भात आमदार बच्चू कडू यांनी आज भूमिका स्पष्ट केली. यावेळी बच्चू कडू यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. 'गरिबांची मुलगी गेली तर पळाली,श्रीमंतांची गेली तर लव्ह मॅरेज', अशा शब्दात बच्चू कडू बंडखोर आमदारांवर टीका करणाऱ्या विरोधकांवर जोरदार टीका केली.

bacchu kadu
Bacchu Kadu: पहिली वेळ आहे म्हणून माफ करतो, पण पुन्हा वाट्याला जाल तर... बच्चू कडूंचा रवी राणांना इशारा

रवी राणा यांनी आपले शब्द मागे घेतल्यानंतर बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनीही नरमाईची भूमिका घेतली. मात्र प्रहारच्या मेळाव्यात आमदार बच्चू कडू यांनी आपल्या स्टाईलमध्ये त्यांच्या विरोधकांना इशारा झाला. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही, पण आमच्या मागे कोण लागलं तर त्यांना सोडत नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.

'प्रहार आंडूपांडूचा पक्ष नाही. आम्ही रक्ताचं पाणी केलं ते राजकारणासाठी नाही केलं. दिव्यांगासाठी आम्ही काम केलं. एकानेही त्यांच्यासाठी विधानसभेत आवाज उठवला नाही. ते काम आम्ही केलं. आम्ही उगाच गुवाहाटीला गेलो नाही. मंत्री होतोच की, मग शिंदे (Eknath Shinde) गटासोबत जाण्याची गरज काय होती. परंतु सत्ता वंचित घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सत्तेसोबत जावं लागलं, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.

bacchu kadu
Akola Crime News: ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख विशाल कपले यांची भररस्त्यात निर्घृण हत्या; थरारक Video आला समोर

आमदार रवी राणा यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपांवर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, राणा यांची पहिली वेळ आहे म्हणून त्यांना माफ करतो. मात्र पुन्हा आमच्या वाट्याला गेलं तर काही खैर नाही, असा इशारा देखील बच्चू कडून यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com