Barsu Refienry Project Latest News:  Saam Tv
महाराष्ट्र

Ratnagiri News: बारसूत बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांची गाडी पलटी, 17 जखमी

रत्नागिरीतील बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाला आजपासून होणार पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे.

Shivani Tichkule

रणजीत माजगावकर

Barsu Refienry Project Latest News: रत्नागिरीतील बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाला आजपासून होणार पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झाले आहे.मात्र त्याआधी रिफायनरी सर्वेक्षण बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आहे. (Latest Marathi news)

या अपघातामध्ये 17 पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.सर्व जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कशेडी गावाजवळ हा अपघात झाला आहे. कशेळी बांध येथे पोलिसांची गाडी पलटी झाली.

रिफायनरीला विरोध करणाऱ्या नोटीसा

रिफायनरीला विरोध करणाऱ्या विरोधकांना नोटीसा पाठवण्यात आल्या असून 45 रिफायनरी (Barsu Refinery) विरोधकांना 144 सीआरपीसीअन्वये प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. काहींना बारसू पंचक्रोशीत तर काहींना जिल्हाबंदीची नोटीस देण्यात आली आहे.

दरम्यान, सर्वेक्षण सुरळीत पार पडावं यासाठी बारसू परिसरात 2000 पोलीसांचा (Police) बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. या बंदोबस्तासाठी ठाणे ग्रामीण, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीसांना पाचारण करण्यात आले आहे.

ग्रामस्थांचा लॉग मार्च

रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील बारसू इथं होऊ घातलेल्या रिफायनरीच्या विरोधात विरोधक एकवटले असून शेकडो रिफायनरी विरोधक बारसुच्या रानमळावर जमा झाले आहेत. जोरदार घोषणाबाजी करत सर्वे रद्द होईपर्यंत रिफायनरी विरोधक ठिय्या मांडणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलेला आहे.

रिफायनरी विरोधकांच्या भोवती कायद्याचा फार्स

बारसू रिफायनरी विरोधकांनी सर्वेक्षणाच्या कामात अडथळा आणू नये यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाने रिफायनरी विरोधकांभोवती कायद्याचा फार्स आवळला आहे. रिफायनरी विरोधक समितीचे सल्लागार सत्यजित चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश चव्हाण यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कलम 151(3) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. दोघांनाही 25 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रविवारी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

SCROLL FOR NEXT