Maval News: मावळ बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट; काँग्रेसमध्ये दुफळी, राष्ट्रवादीत बंडखोरी...

या निवडणुकीसाठी आमदार सुनील शेळके व माजी राज्यमंत्री बाळ वेगळे या दोघांनीही आपली ताकद पणाला लावली असल्याने ही निवडणूक चुरशीची होईल हे नक्की.
Maval News
Maval NewsSaam Tv
Published On

Maval News: राज्यात काँग्रेस आणि भाजप एकमेकांचे कट्टर शत्रू असताना मावळ मावळात मात्र वेगळेच चित्र बघायला मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीत काँग्रेसचा एक गट भाजपासोबत तर दुसरा गट महाविकास आघाडी सोबत गेला आहे. दोन्ही काँग्रेसच्या भांडणात भाजपाने मात्र सावध भूमिका घेत सर्वपक्षीय पॅनल उभे केले आहे.

सहकार क्षेत्रात पकड असलेले जिल्हा बँकेचे संचालक माऊली दाभाडे हे महाविकास आघाडी सोबत आहे तर काँग्रेसचे दुसरे नेते चंद्रकांत सातकर हे सर्वपक्षीय पॅनल सोबत आहे.काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाल्याने दुफळी निर्माण झाली आहे. (Latest Marathi News)

Maval News
India Corona Update: दिलासादायक! देशात कोरोनाचा वेग मंदावला, 24 तासांत 7 हजार रुग्णांची नोंद

मात्र या निवडणुकीत विद्यमान आमदार सुनील शेळके की माजी मंत्री बाळा भेगडे यातील कोण बाजी मारणार हे निकालाच्या दिवशीच कळेल. दरम्यान दोन्ही पॅनल चा प्रचार सुरू झाला आहे. महाविकास आघाडी व भाजपचे (BJP) सर्व पक्ष पॅनल या दोन्ही पॅनलच्या प्रचाराचा नारळ वडगाव येथील ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिरात फोडण्यात आला त्यानंतर दोन्ही पॅनलच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे.

मावळ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच कार्यालयच नाही. बाळा भेगडे दहा वर्ष आमदार होते आणि राज्यमंत्री होते. मात्र कार्यालय तयार करू शकले नाही.त्यांनी कार्यालय ना झाल्याचं खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) फोडले तर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाचा आराखडा तयार केला होता मात्र आमचं सरकार बदली झालं. मात्र 25 वर्षा यांचे सरकार आहे ते का करू शकले नाही असा पलटवार मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी भाजपवर केला.

Maval News
Sanjay Raut on Sharad Pawar: 3 पक्षांनी एकत्र राहवं ही पवारांचीच भूमिका; शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया

मावळ तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बारा वर्षानंतर होत असून गतवेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील बाजार समिती यावेळी ताब्यात घेण्यासाठी भाजपने आघाडीतील काँग्रेसच्या एका गटाला हाताशी धरले आहे. या निवडणुकीसाठी आमदार सुनील शेळके व माजी राज्यमंत्री बाळ वेगळे या दोघांनीही आपली ताकद पणाला लावली असल्याने ही निवडणूक चुरशीची होईल हे नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com