बग  विश्वभुषण लिमये
महाराष्ट्र

बार्शीच्या मयूरने इन्स्टाग्रामवरील शोधला बग; युजर्सची वाचवली प्रायव्हसी

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील मयूर फरताडे याने फेसबुक इंस्टाग्रामवरचा एक बग शोधून काढला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विश्वभुषण लिमये

सोलापूर : सोलापूर Solapur जिल्ह्यातील बार्शीतील Barshi मयूर फरताडे याने फेसबुक इंस्टाग्रामवरचा Instagram एक बग Bug शोधून काढला आणि फेसबुकला Facebook कळवला आणि करोडो लोकांची प्रायव्हसी वाचवली आहे. हा बग फेसबुकला कळवल्यानंतर फेसबुकने त्याला तब्बल 22 लाखांचे बक्षीस दिलं आहे... Barshis young boy discovered a bug in Instagram and saved users privacy

भारतातील आयटीच्या नव्या नियमांवरून केंद्र सरकार आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे आणि वाद सुरू आहे. परंतु आपण वापरत असलेले इंस्टाग्राम किंवा फेसबुक किती सुरक्षित आहे हे आपल्याला माहिती आहे काय ? जगाच्या कानाकोपऱ्यात हॅकर्स डेटा चोरण्यासाठी बसले आहेत.

ही बाब कोल्हापूर Kolhapur येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या बार्शीतील मयूर फरताडे याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामला हे बग कळवून हॅकर्सच्या Hackers हातात येण्यापासून वाचविले आहे. त्याची दखल घेत फेसबुकने त्याला 22 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसा मेल त्याला पाठविला आहे.

मयूर फरताडे याने त्याच्या कमतरता सांगितली आणि अनेक वापरकर्त्यांचा डेटा चोरण्यापासून फेसबुकला चांगलेच वाचविले आहे. इन्स्टाग्रामचा हा बग एखाद्या युजरला इन्स्टाग्रामवर टार्गेटेड मीडिया Media दाखवू शकत होता. मीडिया आयडीची मदत घेऊन कोणत्याही युजरचे खाजगी आणि अर्चिव Archieve केलेल्या पोस्ट, स्टोरी, रील आणि IGTV व्हिडिओही बघता येत होते. जरी त्या युजर चे अकाउंट प्रायव्हेट असले तरी. त्यासाठी युजरला फाॅलो करणे गरजेचे नव्हते.

हे देखील पहा-

फेसबुक व इन्स्टाग्रामलासुद्धा त्याच्या दोघांची माहिती नव्हती. फेसबुकच्या बग बॉउंटी प्रोग्रॅमच्या माध्यमातून मयूरने या त्रुटीची माहिती १६ एप्रिलला दिली. कंपनीने १५ जूनपर्यंत ही चूक सुधारली आहे.

बार्शी तिथं सरशी म्हणतात ते काही खोटं नाही, बार्शी ही विविध नाविन्यपूर्ण कल्पनांची आणि खाण आहे. त्याच्यातून मयूरसारखे हिरे सतत निपजत असतात, फक्त त्याकडे शासन, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT