Baramati Superman Saam Tv
महाराष्ट्र

Baramati Superman: बारामतीचा लहानगा 'सुपरमॅन', जीवावर खेळून वाचवले वृद्ध दाम्पत्याचे प्राण (पहा Video)

या तरुणाने ब्रेक निकामी झालेली दुचाकी पळत जाऊन धरल्याने वृद्ध पती-पत्नी सुखरुप बचावले

मंगेश कचरे

बारामती: काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती. असाच काहीसा अनुभव बारामतीतील (Baramati) इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील वृद्ध जोडप्याला आलाय. या दाम्पत्याची ब्रेक निकामी झालेली दुचाकी युवकाने पळत जाऊन धरल्याने हे वृद्ध पती-पत्नी सुखरूप बचावले आहेत. या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळलाय. रियाज मुलाणी असे या 17 वर्षीय धाडसी युवकाचे नाव आहे (Baramati Superman young boy save the life of old couple by stopping bike that had failed the brake).

मंगळवारी नेहमीप्रमाणे रियाज घरातील कामकाजामध्ये कुटुंबियांना मदत करत होता. यावेळी घराच्या समोरील रस्त्यावरुन एक वृद्ध दाम्पत्य (Couple) टीव्हीएस लुना या दुचाकीवरुन ओरडत येत असल्याचे त्याला दिसले. गाडीचे ब्रेक (Break) लागत नाहीत. आम्हाला वाचवा, अशी आर्त विनवणी ते जोडपे करत असल्याचे रियाजच्या निदर्शनास आले.

पाहा व्हिडीओ -

वेगात असणारी दुचाकी थांबवायची कशी? असा विचार सुरुवातीला रियाजच्या मनात आला. मात्र, दुचाकीच्या मागे पळत रियाजने दुचाकीचे कॅरेज घट्ट धरले आणि दुचाकी (Bike) थांबवली. रियाजच्या या प्रसंगावधानामुळे या वृद्ध दाम्पत्य सुखरुप बचावलं आहे. जर ही दुचाकी थांबली नसती तर समोरील इंदापूर-बारामती (Baramati) राज्य महामार्गावर गेली असती. मात्र रियाजने दाखवलेल्या धाडसामुळे पुढील अनर्थ टळला.

या प्रसंगातून बचावल्यानंतर वृद्ध दाम्पत्याने 'बरे झाले लेकरा तू होतास, म्हणून आम्ही वाचलो' अशा शब्दात रियाजचे आभार मानले. हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला. रियाजच्या या धाडसाचे आणि प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामस्थांच्या वतीने रियाजचा सत्कार करण्यात आला.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat : पोटावरची अतिरिक्त चरबी वाढवते 'या' गंभीर आजारांचा धोका, दुर्लक्ष करणे पडेल महागात

महाबळेश्वरच्या पिकनिकचा भयानक शेवट! हायवेवर कारचा चक्काचूर, मावळच्या ४ मित्रांचा जागीच मृत्यू, दोघांची मृत्यूशी झुंज

Maharashtra News Live Update: कराडला मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताचे बॅंनर फाडले

Mumbai Local: मुंबईत धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, गर्दीमुळे हात सटकला अन् थेट खाडीत पडला

Urine Infection : लहान मुलांना युरिन इन्फेक्शन झाले तर शरीर देते 'हे' संकेत; पावसाळ्यात वेळीच उपचार करा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT