Sharad Pawar Vs Ajit Pawar Saam Digital
महाराष्ट्र

Baramati Politics: ४ वेळा उपमुख्यमंत्री येऊनही अजित पवारांवर कसला अन्याय झाला?, शरद पवार यांचा सवाल

Sharad Pawar On Ajit Pawar: शरद पवार यांनी आज बारामतीमधील माळेगाव बुद्रुक येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी आज माळेगाव मतदान केंद्रावर जाऊन मतदान केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील मतदान केंद्रावर शरद पवारांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. 'महाराष्ट्राच्या सत्तेत अनेकदा आणि चार वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री होऊनही अजित पवारांवर कसला अन्याय झाला.', असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. यावेळी, 'राज्यात महाविकास आघाडीचे सरकारी येईल.', असा विश्वास शरद पवारांनी यावेळी उपस्थित केला.

अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगता सभेत अजित पवार यांच्यावर अन्याय झाला, अशा पद्धतीचा खुलासा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी '४ वेळा उपमुख्यमंत्री येऊनही अजित पवारांवर कसला अन्याय झाला?', असा सवाल उपस्थित केला. शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या कुटील राजनीतीचा सातत्याने उल्लेख करीत महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा लागल्याचे स्पष्टपणे बोलून दाखवले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला, सुप्रिया सुळे यांच्यावरती झालेल्या भ्रष्टाचाराचा आरोपावर शरद पवार यांनी भाष्य केले.

सुप्रिया सुळे यांच्यावर ज्या व्यक्तीने आरोप केले तो व्यक्ती कसा आहे याची चौकशी करावी. त्याला अधिकचे काही महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. सुप्रिया सुळेंना बारामतीकरांनी चौथ्यांना संसदेत पाठवले यात समाधान आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला हा दुर्दैवी प्रकार आहे. यावरूनच भारतीय जनता पार्टीची विचाराची पात्रता दिसून येते. विनोद तावडे यांच्यावर झालेल्या गुन्ह्याची माहिती मला नाही. माहिती घेऊन बोलणे आवश्यकता आहे , असे पवार यांनी स्पष्ट केले. तसेच , महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी उत्तम पद्धतीने यशस्वी होईल, असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhuri Dixit: माधुरी दिक्षीतचं सौंदर्य पाहिलं अन् चाहत्यांच्या हृदयात धक धक झालं...

Shiv Sena Rada : मलाडमध्ये ठाकरे-शिंदे गटात राडा, संजय निरुपम यांनी खुर्ची आणि टेबल फेकला, कोल्हापुरातही शिवसैनिक भिडले!

VIDEO : आमदार रमेश बरनारे यांच्या वाहनावर दगडफेक; वैजापुरात तुंबळ राडा | Marathi News

Nitesh karale : कराळे मास्तरांना बेदम मारहाण; भाजप कार्यकर्त्याने कॉलर धरली, कानफटवलं

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: सायन कोळीवाडा मतदारसंघांमध्ये पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक

SCROLL FOR NEXT