Ajit Pawar On Sharmila Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: शर्मिला पवारांकडून गंभीर आरोप, अजित पवारांनी तातडीने मतदान केंद्र गाठले, म्हणाले...

Ajit Pawar On Sharmila Pawar: शर्मिला पवार यांच्या आरोपांवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. हे आरोप धादांत खोटे असल्याचे म्हटले आहे.

Priya More

'बारामतीमध्ये बोगस मतदान होत आहे आणि शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे.' असा आरोप शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी केले आहेत. बारामतीमधील मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचे कळताच अजित पवार यांनी मतदान केंद्रावर धाव घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना शर्मिला पवार यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांनी शर्मिला पवार यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

शर्मिला पवार यांचे आरोप अजित पवार यांनी फेटाळून लावत सांगितले की, 'शर्मिला पवार यांचे आरोप धांदात खोटा आहे. तसं असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यामध्ये सर्व कैद झाले आहेत. तसे असेल तर निवडणूक अधिकारी बघतील. आज आम्ही ऐवढ्या निवडणुका पार पाडल्या त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी अशापद्धतीची वक्तव्य केली नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी धमक्या दिल्या नाही. मला माझ्या कार्यकर्त्यावर ठाम विश्वास आहे.'

'तुम्ही ज्या पक्षाचे कार्यकर्ते असतात त्या पक्षाची स्लिप दिली जाते. मतदान केंद्रावर आल्यानंतर चिन्ह असलेला कागद फाडला जातो आणि नंतर मतदान केले जाते हे आधीपासून चालत आले आहे. १ वाजत आला तरी मतांची टक्केवारी कमी आहे. जास्तीत जास्त मतदान केले पाहिजे असे आवाहन अजित पवार यांनी जनतेला केले आहे. तुमचा हक्क बजावा, जो उमेदवार योग्य वाटेल त्याला मतदान करा. मतदानाचा अधिकार सर्वांनी बजवावा. कुणीही मतदानाचा अधिकार गमवावू नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

अजित पवार यांनी पुढे सांगितले की, 'त्यांनी तक्रार केली असली तरी पोलिस तपास करतील. निवडणूक आयोग्य तपास करतील आणि काय खरे आणि काय खोटो ते काढतील. प्रत्येक तक्रारीमध्ये तथ्य नसते. आम्ही नियमाचे पालन करणारी लोकं आहोत. माझे पोलिंग एजंट असे धमकावण्याचे काम करणार नाही. मला त्यांच्यावर विश्वास आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Raj & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचा नवा टीझर; मराठी अस्मितेचा बुलंद आवाज पुन्हा दुमदुमला|VIDEO

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

SCROLL FOR NEXT