Tukaram Maharaj Palkhi Saam tv
महाराष्ट्र

Tukaram Maharaj Palkhi : तुकाराम महाराजांच्या पादुकांना शाही नीरा स्नान; पालखी सोहळ्याचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

Baramati News : पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत अकलूज येथे प्रवेश केला. प्रवेशापूर्वी सोलापूर आणि पुणे जिल्हा यांची सीमा असलेल्या नीरा नदी पात्रात तुकोबारायांच्या पादुकांना निरास्नान घालण्याची परंपरा आहे

मंगेश कचरे

बारामती : जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सराटी गावातील शेवटचा मुक्काम आटोपून नीरा नदीमध्ये पादुकांना पवित्र स्नान घालण्यात आले. यानंतर आरती- महापूजा करण्यात आली. तर सोमवारी ३० जूनला पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील सराटी गावात पालखी सोहळा मुक्कामी विसावला होता. यानंतर सोलापूर जिल्ह्यात पालखीचा प्रवेश झाला. 

पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत अकलूज येथे प्रवेश केला. प्रवेशापूर्वी सोलापूर आणि पुणे जिल्हा यांची सीमा असलेल्या नीरा नदी पात्रात तुकोबारायांच्या पादुकांना निरास्नान घालण्याची परंपरा आहे. सोलापूर जिल्ह्यात पालखी सोहळ्याने प्रवेश केल्यानंतर संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील मानाचे तिसरे गोल रिंगण माळशिरस तालुक्यातील अकलूज या ठिकाणी सदाशिवराव माने विद्यालयात पार पडणार आहे.

पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम 

मागील दहा- बारा दिवसांपासून तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरला विठोबारायाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाला आहे. पालखी सोहळ्याचे ठिकठिकाणी स्वागत केले जात असून आता हा पालखी सोहळा पुढील काही दिवसात पंढपुरात दाखल होणार आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम इंदापूर तालुक्यातील सराटी गावात झाला. याठिकाणी आज पहाटे तुकाराम महाराजांच्या पादुकांना शाही नीरा स्नान करण्यात आले. 

यंदा नदीच्या पाण्याने स्नान 

आज मंगळवारी १ जुलै रोजी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी देहू संस्थांच्या वतीने व स्थानिक प्रमुख ग्रामस्थ, मान्यवरांच्या हस्ते नीरा नदी पात्रात पादुकांना शाही स्नान घालण्यात आले. दुष्काळामुळे मागील काही वर्षात तुकोबारायांचे पादुका स्नान हे टँकर मधील पाण्याच्या साह्याने करण्यात येत होते. परंतु यावर्षी पहिल्यांदाच ऐन उन्हाळ्यात नीरा नदी परिसरातील पश्चिम भागात झालेल्या पावसामुळे नदीपात्रात पाणी वाहते आहे. या वेळी हजारो वैष्णवांनी नदीपात्रात डुंबण्याचा आनंदही साजरा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: मोठी बातमी! यापुढे कर्जमाफीत रकमेची मर्यादा नाही, २५ लाख शेतकऱ्यांना होणार फायदा

विद्यार्थ्यांना गॅलरीत बसून शिक्षण घेण्याची वेळ, मुंबईतील हायस्कूलमधील धक्कादायक प्रकार; कारण काय?

DRDO Recruitment: डीआरडीओमध्ये नोकरीची संधी; ७६४ पदांसाठी भरती; पगार १,१२,४०० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी खुशखबर

EVM हॅकिंगसाठीच मतमोजणी लांबणीवर'; काँग्रेसचा भाजपवर मोठा आरोप

SCROLL FOR NEXT