Someshwar Sugar Factory Election  Saam Tv
महाराष्ट्र

Baramati News: 'सोमवेश्वर' निवडणुकीत जय पवारांचा करिश्मा, २१ -० ने विजय; शरद पवार गटाचा दारूण पराभव

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला. २१ पैकी २१ जागा जिंकत राष्ट्रवादीने या कारखान्यावर वर्चस्व कायम ठेवलं.

Priya More
  • सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल

  • सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या पॅनलचा विजय

  • सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत २१-० असा निकाल

  • शरद पवार गटाचा सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पराभव

  • पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलला मोठा धक्का

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बाजी मारली. या निवडणुकीत जय पवारांनी करिश्मा दाखवत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आणि सोमेश्वर साखर कारखान्यावर वर्चस्व कायम ठेवलं. सोमवारी या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. ही निवडणूक खूपच चुरशीची ठरली होती. या निवडणुकीत कोणाचा विजय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पॅनलने २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवला. त्यानंतर सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या पॅनलने एकच जल्लोष केला.

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचा पॅनेल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पॅनेल आणि राष्ट्रवादीतून बंडखोरी करत भाजपच्या मदतीने पॅनेल उभं करणाऱ्या पुरूषोत्तम जगताप यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली. या निवडणुकीत तिन्ही पॅनलसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीसाठी ११ ऑक्टोबरला मतदान झालं होतं. तर १२ ऑक्टोबर रोजी निकाल लागला. या निवडणुकीचा निकाल २१-० असा लागेल असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला होता आणि ते खरं ठरलं. सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.

बारामतीतील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या पॅनलवर अनेक आरोप झाले. तरी देखील विजय आपलाच होईल असा विश्वास जय पवार यांनी सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला होता. या निवडणुकीच्या प्रचारात जय पवार यांनी आपला करिश्मा दाखवला. जाहीर सभेतच सुनेत्रा पवार यांनी जय पवार यांनी १०० टक्के आपल्याला विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला होता. तसंच, सोमेश्वर कारखान्याची निवडणूक एकतर्फी असल्याची प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली होती. २१ पैकी २१ जागा आपणच जिंकणार यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, नीरा-बारामती रस्त्यावरील माळेगाव बुद्रुक येथील अजंता मॅजिस्टिक बॅक्वेट हॉलमध्ये मतमोजणी पार पडली. निवडणुकीतील एकूण ९३ केंद्रांवरील मतपेट्यांमधील मतांची मोजणी केली गेली. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे ४५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मतमोजणीच्या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या निवडणुकीत विजय झाल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या पॅनेलने जिल्ह्यात एकच जल्लोष केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार गटाची सत्ता

ट्रक-मोटारसायकलची समोरासमोर धडक; जवानासह दोघांचा जागीच मृत्यू, संभाजीनगरमध्ये हळहळ

Walking Timing: सकाळी ७, दुपारी १२ की संध्याकाळी ७ वाजता...; कोणत्या वेळेला चालणं सर्वात बेस्ट?

मुंबईमध्ये विषारी ताडीचा संशय; २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये टेबलावर कोसळताना दिसला तरुण

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ३४व्या वर्षी निधन, मनोरंजन विश्वात हळहळ

SCROLL FOR NEXT