HSC Exam Baramati News Saam tv
महाराष्ट्र

HSC Exam: बारावीच्‍या परीक्षेत सामुहिक कॉपीत शिक्षकही सहभागी; ९ शिक्षकांवर गुन्हा दाखल

बारावीच्‍या परीक्षेत सामुहिक कॉपीत शिक्षकही सहभागी; ९ शिक्षकांवर गुन्हा दाखल

मंगेश कचरे

बारामती : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील केडगाव येथील जवाहरलाल माध्यमिक विद्यालयात बारावीच्या परीक्षेत (HSC Exam) विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी मदत केल्याने स्थानिक ९ शिक्षकांवर यवत पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Live Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (२७ फेब्रुवारी) बारावीची परीक्षा सुरू असताना भरारी पथकाने या ठिकाणी भेट देऊन तपासणी केली असता काही विद्यार्थी सामूहिक कॉपी करताना आढळून आले. या सर्व प्रकाराला या ठिकाणी उपस्थित असणारे शिक्षक अप्रत्यक्षरित्या जबाबदार असल्याचे निदर्शनास आले.

परीक्षा केंद्र संचालकास ९ जणांवर गुन्‍हा

या प्रकारानंतर पथकातील प्राथमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ यांनी यवत पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. जालींदर नारायण काटे (परिक्षा केंद्र संचालक), रावसाहेब शामराव भामरे (उपकेंद्र संचालक), कुचेकर प्रकाश, दिवेकर विकास, गोरगल शाम, काशीद कविता, गवळी जयश्री, होन सुरेखा, सोननवर अभय या शिक्षकांवर महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा सन १९८२ महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर निर्दिष्ट परिक्षा कायदा १९८२ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani Crime : परभणीत खळबळ; मध्यवस्तीत आढळला महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

Shocking News: नूडल्स खाणाऱ्यांनो सावधान! पाकिटामध्ये आढळली मेलेली पाल; VIDEO व्हायरल

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

Ladki Bahin Yojana : लाडकीचे किती अर्ज आले? किती अपात्र? दर महिन्याला किती पैसे लागतात?

Maharashtra Politics: रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांनी घेतली अनिल परबांची भेट, राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

SCROLL FOR NEXT