Baramati Crime Saam tv
महाराष्ट्र

Baramati Crime : वस्तीवर चोरट्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांच्या डोक्यात कोयत्याने वार, शेतकरी गंभीर जखमी

Baramati News : बारामतीच्या दौंड तालुक्यातील केडगाव मधील मोरे वस्तीवर शनिवारी रात्रीच्या सुमारास हि थरारक घटना घडली आहे. यात वस्तीमध्ये ५ ते ६ जणांच्या अज्ञात टोळक्याने चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला

मंगेश कचरे

बारामती : पाऊस सुरु असताना भर पावसात चोरट्यांचा धुमाकुळ सुरु असल्याचे पाहण्यास मिळत आहे. दौंड तालुक्यातील केडगाव मधील वस्तीवर चोरीच्या उद्देशाने आलेल्या टोळक्याने हैदोस घातला आहे. यावेळी या चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करत दागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाले आहेत. दरम्यान घटनेत शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. 

बारामतीच्या दौंड तालुक्यातील केडगाव मधील मोरे वस्तीवर शनिवारी रात्रीच्या सुमारास हि थरारक घटना घडली आहे. यात वस्तीमध्ये ५ ते ६ जणांच्या अज्ञात टोळक्याने चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला. मध्यरात्रीची वेळ असल्याने सर्वच कुटुंबीय गाढ झोपेत होते. काहीजण घराच्या अंगणात झोपले होते. तर काहीजण घरात झोपलेले होते. याच वेळी या चोरटयांनी परिसरात हैदोस घातला होता. 

झोपलेले असतानाच केला वार 

दरम्यान मोरे वस्ती परिसरात पोपट मोरे हे आपल्या राहत्या घरा समोर झोपलेले असताना अचानक आलेल्या या चोरट्यांनी पोपट मोरे यांच्यावर कोयत्याने वार केला. आवाज ऐकून जागे झालेले पोपट मोरे यांचे बंधू बाळासाहेब मोरे यांना देखील चोरट्यांनी गळ्याला चाकू लावत धमकावले. त्यांनी आरडाओरडा केल्याने चोरटे पसार झाले. यातील जखमी पोपट मोरे यांच्या वर केडगाव मधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दागिन्यांची केली चोरी 

तर याच परिसरातील देशमुख भागात अशोक देशमुख यांच्या घरी देखील चोरट्यांनी दोन तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे. तर काकडे वस्तीवरील नवनाथ देशमुख यांच्या घराला बाहेरून कडी लावण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी भेट देत तपासाला सुरवात केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: जीवावर उदार होऊन शिक्षणासाठी दररोज नदी पार करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष कधी थांबणार? VIDEO

Maharashtra Live News Update: आमदार संग्राम जगताप यांना गोळी घालण्याची धमकी; जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सुरक्षा वाढवण्याचे आदेश

Hunger Causes : असा कोणता आजार आहे ज्यात प्रचंड भूक लागते?

Jalna Crime : मुलीच्या छेडखानीला विरोध करणाऱ्या पित्याला बेदम मारहाण; जालन्यातील धक्कादायक घटना

Vande Bharat Updates : आता वंदे भारतने अयोध्याला जा, २७ ऑगस्टपासून सुरू होणार एक्सप्रेस, वाचा रूट अन् तिकिट

SCROLL FOR NEXT