पर्यटन बुकिंगच्या ऑफिसमधील महिलेवरतीच चाकूहल्ला; बारामतीमधील धक्कादायक घटना
पर्यटन बुकिंगच्या ऑफिसमधील महिलेवरतीच चाकूहल्ला; बारामतीमधील धक्कादायक घटना मंगेश कचरे
महाराष्ट्र

पर्यटन बुकिंगच्या ऑफिसमधील महिलेवरतीच चाकूहल्ला; बारामतीमधील धक्कादायक घटना

मंगेश कचरे

बारामती : बारामती शहरातील नीरा डावा कालवा शेजारी असणाऱ्या पूर्वाकॉर्नर कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या, केसरी टूर्स च्या ऑफिसमध्ये आज सकाळी ऑफिसमध्ये पर्यटनाचे बुकिंग (Tourist booking) करणाऱ्या महिलेवर चाकूने हल्ला करण्यात केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आज सकाळी साडेदहा वाजता शहरातील केसरीच्या रजत टूर्सचे ऑफिस उघडल्यानंतर हा तरुण ऑफिसमध्ये आला. 'मी काल आपल्या ऑफिसला येऊन गेलो. परंतु आपण काल ऑफिस लवकर बंद केले.' असे म्हणत या आरोपीने महिलेच्या गळ्यात हात घातला.

तेव्हा या महिलेने आपली सोन्याची चेन चोररतोय की काय? म्हणून या महिलेने त्या आरोपीचा हात धरला नंतर या आरोपीने माझा हात सोड असे म्हणून त्याने हातावर चाकूचा वार करून तो पळून गेला आहे. त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु तो आपली चप्पल न घालताच गाडीवर बसून पसार झाला. दरम्यान महिलेला चाकू लागल्याने त्यांच्या हाताला जखम झाली आहे यासंदर्भात बारामती शहर पोलिस स्टेशनचे (Baramati City Police Station) पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन येथील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज काढून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

Hardik Pandya Troll: हार्दिकने रोहितलाच केलं प्लेइंग ११ मधून बाहेर! फॅन्सच्या संतप्त प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT