Baramati Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Baramati : १० हजारांचा हप्ता दिला नाही; गावगुंडांकडून हॉटेल मालकाला बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

Baramati Crime News : बारामतीत ७ ते ८ गुंडांनी १० हजार हप्ता न दिल्याच्या रागातून हॉटेलचालकावर जीवघेणा हल्ला केला. हॉटेलची तोडफोड करत मालकाला बेदम मारहाण करण्यात आली.

Alisha Khedekar

  • बारामतीतील प्रगतीनगरमध्ये हप्ता मागणीवरून हॉटेलचालकावर हल्ला

  • ७–८ गुंडांकडून हॉटेलची तोडफोड

  • CCTV व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

  • नागरिकांमध्ये भीती व संताप

मंगेश कचरे, बारामती

एककीकडे पुण्यात दिवसेंदिवस गुंडगिरीचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे बीडमध्ये दिवसाढवळ्या मस्साजोगचे सरपंच देशमुख यांची हत्या करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच बारामतीत एका हॉटेल चालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सतत वाढणाऱ्या या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत असून या गुंडांवर पोलिसांचा धाक उरलेला नाही का असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

बारामती शहरातील प्रगती नगर मधील एका हॉटेल चालकाला सात ते आठ जणांनी हॉटेल चालवायच असेल तर प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असे म्हणत मारहाण केली आहे. या मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय.बारामती शहरातील प्रगती नगर भागातील एका हॉटेल चालकासोबत ही घटना घडल्याची माहिती आहे.

या संदर्भात आता बारामती शहर पोलीस ठाण्यात हॉटेल मालकाच्या तक्रारी रून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रगती नगर भागातील हे हॉटेल आहे. इथे सात ते आठ मुलांनी, गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी उच्छाद मांडला आहे. या गुंडांनी हॉटेल चालकाला या ठिकाणी धंदा करायचा असेल, तर दरमहा दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिली होती.

मात्र धंदा होत नसल्याच्या कारणाने हॉटेल चालकाने महिन्याला दोन ते तीन हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर हप्ते मागणारांनी या हॉटेल चालकाला हॉटेलची तोडफोड करत हप्ता देत नाही म्हणून त्याला मारहाण केली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला असून बारामती शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Travel : घनदाट जंगलात वसलाय निसर्गरम्य धबधबा, 'हे' आहे बदलापूरजवळील वन डे ट्रिप लोकेशन

बाहेरून नामांकित ब्रँडच्या पिशव्या आत भेसळीचं दूध, नागरिकांच्या जीवाशी खेळ|VIDEO

Maharashtra Live News Update: जालन्यासाठी महायुतीमधील नेत्यांची महत्वाची बैठक

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; 55.88 कोटींचे एमडी ड्रग्ज कारखाने उद्ध्वस्त

Solapur Municipal Election: महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसची आघाडी; माजी महापौरासह या नेत्यांना दिली उमेदवारी, वाचा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT