Baramati Crime News Saam tv
महाराष्ट्र

Baramati Crime News : भेटण्यासाठी बोलावत केले भयानक कृत्य; तरुणाला नग्न करून बेदम मारहाण

Baramati News : तरुणाला भेटण्यासाठी एका पोल्ट्री फॉर्मवर बोलावून घेत चार जणांनी मिळून लाठ्या- काठ्यांनी बेदम मारहाण केली. तसेच कोयत्याने देखील हल्ला केल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे

मंगेश कचरे

बारामती : क्षुल्लक कारणातून वाद विकोपाला जात जीवानिशी मारले जात असते. अशाच प्रकारे पुरंदर तालुक्यातील गुरोळी येथे धक्कादायक घटना घडली असून किरकोळ वादावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच कोयत्याने वार करत या तरुणाला नग्न करून त्याचा व्हिडीओ काढण्यात आला. याप्रकरणी चार जणांविरोधात सासवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील गुरोळी या गावात सदरची धक्कादायक घटना १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. या घटनेत फिर्यादिला पोल्ट्री फॉर्मवर बोलावून चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर त्याला पोल्ट्रीमध्ये खेचत नेऊन काठी व दांडक्याने डोक्यात मारले. एवढ्यावरच न थांबता सुनिल खेडेकर याने कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. या मारहाणीत तरुण स्वतःचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करत होता. 

तरुणाला नग्न करत केला व्हिडीओ 

चौघांनी मिळून तरुणाला मारहाण केल्यानंतर त्याचे कपडे काढून तरुणाला नग्न केले. यानंतर त्याचा व्हिडीओ काढत जीवे मारण्याची धमकी दिली. बेदम मारहाण करण्यात आल्याने तरुण यात गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी सासवड पोलिसांत तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

दरोडा टाकत पती- पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न 

दौंड तालुक्यातील बोरीऐंदी गावात रात्रीच्या वेळी दोन ठिकाणी दरोडा टाकण्यात आला. या घटनेत पती- पत्नीवर धारदार शस्त्राने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. गावात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन चोरांनी दोन ठिकाणी चोरी केली. यातील एका घरातील पती-पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत डोक्यात हातावर धारदार शस्त्राने तसेच राॅडने मारहाण केली आहे. तर दीड ते दोन लाख रुपये रोख व पाच तोळे सोने चोरी करून धमकी देऊन पसार झाले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतात पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी? सैन्य दल हायअलर्ट मोडवर, VIDEO

लोकशाहीची लक्तरं, मतदानाची दुकानं, महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा पाऊस, वॉशिंग मशिन, मिक्सर,चांदीचं वाटप

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना! ट्रकच्या धडकेत दोन सख्या बहिणींचा मृत्यू

मतदानाआधी पैशांनी भरलेली बॅग आढळली, पाकीटं अन् ५०० च्या नोटाच नोटा! VIDEO

साफसफाई करताना अचानक मोठा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, २ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT