Baramati Case Saam tv
महाराष्ट्र

Baramati News : बारामती खून प्रकरणी मोठी अपडेट; चार सख्खे भाऊ, तीन महिलांसह 12 जणांना जन्मठेप, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Baramati Case News : बारामती खून प्रकरणात चार सख्खे भाऊ, तीन महिलांसह 12 जणांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. १२ जण विनोद नरवाल हत्या प्रकरणात दोषी आढळले.

मंगेश कचरे

पुणे : बारामती विनोद नरवाल हत्या प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. बारामतीतील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आज खून खटल्यात ऐतिहासिक निकाल दिला आहे. या प्रकरणात चार सख्खे भाऊ, तीन महिलांसह बारा जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. बारामती अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निर्णय देत एकूण बारा जणांना मोठा दणका दिलाय.

पुण्याच्या दौंड येथील विनोद नरवाल यांची 3 मे 2018 रोजी हत्या झाली होती. विनोद नरवाल त्यांच्या दुचाकीवरुन निघाले असताना अनोळखी लोकांनी तलवार, कोयता, लोखंडी पाईप, काठया, फरशीचे तुकडे, दगडांनी बेदम मारहाण केली. फिर्यादी आणि विनोद यांच्या पत्नी मीना नरवाल यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र दवाखान्यात नेताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दौड पोलिसात बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती एस.आर. पाटील यांच्या समोर हा खटला चालला. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. प्रसन्न जोशी यांनी काम पाहिले. आठ साक्षीदारांची साक्ष या खटल्यात महत्वाची ठरली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पुरावे व न्यायवैद्यकीय पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने वरील बारा जणांना जन्मठेप आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या दंडाची पाच लाखांची रक्कम मीना नरवाल यांना देण्याचेही आदेश न्यायालयाने दिलेले आहेत.

इंदापुरात वर्गणीवरून डॉक्टरला मारहाण

पुण्याच्या इंदापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. बावडा गावात यात्रेच्या वर्गणीवरून डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू उदयसिंह पाटील हे मारहाण करतानाचा व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतोय. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Holi Special Dahi Vada Recipe : होळीला नाश्त्यासाठी खास बनवा दही वडा, एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra Live News Update: हिंगोली जिल्ह्याला मध्यरात्री अवकाळी पावसाचा तडाखा

Rashmika Mandanna : विजयच्या आधी १३ वर्षांनी मोठ्या अभिनेत्याच्या प्रेमात होती रश्मिका; साखरपुडा झाला पण लग्न मोडले, नेमकं कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात ₹१५०० जमा, फक्त याच महिलांना मिळणार जानेवारीचा हप्ता, कारण काय?

Hoil Skin Care: रंग पंचमीला चेहऱ्यावरील कलर तसाच राहण्याची भीती वाटते? मग रंग खेळण्याआधी करा हे स्किन केअर

SCROLL FOR NEXT