Baramati APMC Election Results Saamtv
महाराष्ट्र

Baramati APMC Election Result: बारामतीत फक्त राष्ट्रवादी पुन्हा! १८ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय; भाजपचा उडवला धुव्वा

Market Committee Election Results: बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ

Gangappa Pujari

Baramati Market Committee Election Results: राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी (APMC Result) शुक्रवारी मतदान पार पडले. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी शुक्रवारीच पार पडली. यापैकी काही बाजार समित्यांचे निकाल आज (शनिवारी) जाहीर होत आहेत. यामध्ये बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ करत राष्ट्रवादीने (NCP) दणदणीत विजय मिळवला आहे. (Latest Marathi News)

आज बाजार समित्यांचे निकाल जाहीर होत आहेत. ही निवडणूक महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) विरूद्ध भाजप अशीच होती. यामध्ये बारामती बाजार समितीचे निकाल समोर आले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने एकहाती विजय मिळवत गुलाल उधळला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १८ पैकी १८ उमेदवार निवडून आणत भाजपचा सुपडा साफ केला आहे.

निवडणूकीत १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात राहिले होते. राष्ट्रवादी पुरस्कृत रयत पॅनलचे 17 उमेदवार तर भाजप (BJP) पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे 16 उमेदवारांमध्ये लढत होती. तर एक अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होता.

धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना धक्का...

दरम्यान, बाजार समितीच्या निवडणूकीत बीडमध्येही महाविकास आघाडीचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. आंबाजोगाई बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एकूण आठरा जागांपैकी तब्बल 15 जागांवर मविआनं बाजी मारली आहे. तर  तीन जागांवर भाजपचा विजय झाला आहे. ही निवडणूक मविआच्या पॅनलने धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT