Baramati Agro Exhibition Saamtv
महाराष्ट्र

Baramati News: AIची कमाल! टोमॅटोच्या झाडाला लागले बटाटे; 'पोमॅटो'चे पीक पाहण्यासाठी बारामती कृषी प्रदर्शनात गर्दी

Baramati Agro Exhibition: १८ ते २२ जानेवारी या कालावधीत या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी राज्यातून नव्हे तर परराज्यातून देखील शेतकरी आले आहेत.

मंगेश कचरे

Agricultural Exhibition Baramati:

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन सुरू आहे. १८ ते २२ जानेवारी या कालावधीत या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी राज्यातून नव्हे तर परराज्यातून देखील शेतकरी आले आहेत. शेतीमधील एकापेक्षा एक नाविन्यपुर्ण प्रयोग या प्रदर्शनात शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहेत.

टोमॅटोच्या झाडाला लागलेत बटाटे...

शारदानगरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाचा आज तिसरा दिवस असून,यंदाच्या प्रदर्शनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना नव्यानेच व देशात पहिल्यांदाच साकारण्यात आली आहे. यामध्ये पोमॅटो ही नवीन संकल्पना कृषी विज्ञान केंद्रात राबवून यशस्वी पीक घेण्यात आले आहे.टोमॅटोच्या झाडाला कलम करून बटाट्याचे पीक घेण्यात आले. या माध्यमातून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार असून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.

काय आहे संकल्पना?

सुरूवातीला बटाट्याची लागवड केली जाते आणि त्यानंतर वीस दिवस झाल्यानंतर त्यावर संकरित टोमॅटोचे झाड कलम केले होते. हे ३०-४० दिवस नर्सरीमध्ये ठेवले जाते. त्यानंतर हे शेतात लावण्यायोग्य होते. या पद्धतीने ७०० ग्रॅम ते दीड किलोपर्यंत वजनाचे बटाट्याचे पीक घेता येते. त्याचसोबतीला टोमॅटोचे प्रतिझाड ५ ते ६ किलोपर्यंत उत्पादन घेता येते.

या पिकाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहता येत आहे. दरम्यान, या प्रदर्शनामध्ये परदेशी कोथिंबिरीचे यशस्वी पीक घेतले असून ही परदेशी कोथिंबीर पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. या कोथिंबीरीचे नाव कर्ली पार्सली असे आहे. (Latest Marathi News)

' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adinath Kothare New Project: शिरगावच्या खुनाचं गुंतागुंतीचं कोडं सुटणार का? 1 मे पासून आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर उलगडणार शिरगावचं रहस्य

४ टर्म आमदार राहिलेला भाजपच्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra News Live Update: आमदार दिपक केसरकर यांची घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी

Pankaja Munde: पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा, बड्या नेत्याच्या विधानाने राजकारणात खळबळ

Mumbai : 'मला हिंदू मुली आवडतात...' अश्लील व्हिडिओ पाठवले, शारीरिक संबंधांची मागणी; नाशिकनंतर मुंबईत कॉर्पोरेट जिहाद

SCROLL FOR NEXT