Bank Holiday in July 2022, Bank Holidays, RBI News Saam Tv
महाराष्ट्र

जूलैत 14 दिवस बँका राहणार बंद; पहा सुट्ट्यांची यादी

आरबीआयने काही दिवसांपुर्वी एक परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये सुट्ट्यांची यादी जाेडण्यात आली आहे.

साम न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : जून महिना संपण्यास अवघे काही चार दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान येत्या जुलै महिन्यात 14 दिवस बॅंकांना (bank) सुटी (holidays) राहणार आहे. त्यामुळे तुमची बॅंकेत काही महत्वाची कामे असतील तर काेणत्या दिवशी सुटी असेल याची माहिती जाणून घ्या. (Bank Holiday in July 2022)

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या (RBI) माध्यमातून काही दिवसांपुर्वी एक परिपत्रक काढण्यात आले आहे. या परिपत्रकात जूलै महिन्यातील सुटीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आरबीआयने जाहीर केलेल्यानुसार जुलै महिन्यात एकूण चाैदा दिवस बँकांनी सुट्टी राहील. तसेच त्या त्या राज्यांतील तसेच तेथील सण उत्सव या कालावधीतील सुट्ट्या बदलू शकतात.

जूलै 2022 मधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी

1 जुलै : कांग (रथजत्रा) / रथयात्रा (भुवनेश्वर, इंफाळ)

3 : रविवार (सार्वजनिक सुट्टी)

7 : (खरची पूजा) : आगरतळ्यात बँका बंद राहणार आहेत.

9 : दुसरा शनिवार

10 : रविवार (सार्वजनिक सुट्टी)

11 : ईद-उल-आझा (जम्मू, श्रीनगर)

13 : भानू जयंती (गंगटोक)

14 : शिलाँगमध्ये बँका बंद राहणार आहेत.

16 : हरेला (डेहराडून)

17 : रविवार (सार्वजनिक सुट्टी)

23 : चौथा शनिवार

24 : रविवार (सार्वजनिक सुट्टी)

26 : केरला पूजा (अगर)

31 : रविवार (सार्वजनिक सुट्टी)

या सर्व सुट्ट्या आरबीआयने जाहीर केलेल्या आहेत. दरम्यान नागरिकांना नेट बँकिंग तसेच मोबाईल बँकिंग या सुविधेचा वापर करुन ते सुटी दिवशी बॅंकींगचे व्यवहार करु शकतात.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

SCROLL FOR NEXT