गैरबंजारा नागरीकांना बंजारा जातीचे प्रमाणपत्र!जालन्यातील धक्कादायक प्रकार
गैरबंजारा नागरीकांना बंजारा जातीचे प्रमाणपत्र!जालन्यातील धक्कादायक प्रकार  लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

गैरबंजारा नागरीकांना बंजारा जातीचे प्रमाणपत्र!जालन्यातील धक्कादायक प्रकार

लक्ष्मण सोळुंके

जालना : गैरबंजारा समाजाच्या नागरीकांना बंजारा जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जालन्यात उघडकीस आला आहे. बंजारा समाजाच्या नागरिकांकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत असून जालन्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून हे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा -

विशाल मोरे, किशोर भिडे यांच्यासह आणखी दोन जणांच्या नावानं हे प्रमाणपत्र देण्यात आले असून आणखी किती जणांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे याविषयीची सखोल चौकशी करून बंजारा समाजाच्या नावाने प्रमाणपत्र घेणाऱ्या नागरिकांसह प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शिवाय विधिमंडळात याप्रकरणी प्रश्न उपस्थित करणार असून दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याच देखील राठोड यांनी म्हटलं आहे. दरम्यान, बंजारा समाजातील काही कार्यकर्त्यांनी आज या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. मात्र प्रशासनातील कोणताही अधिकारी याबाबत माध्यमांशी बोलायला तयार नाही.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bridal Beauty Tips : लग्नाच्या किती दिवस आधी फेशिअल करायचं? जाणून घ्या ब्रायडल ब्युटी टिप्स

Sanjay Raut: नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा.. संजय राऊतांचा मोठा आरोप; CM शिंदेंवर निशाणा

Sunil Tatkare News | सुनील तटकरे यांना कोर्टाची नोटीस, खर्चात आढळली तफावत

Today's Marathi News Live : नाशिकमध्ये बारदानाच्या गोदामाला भीषण आग

Ghaziabad Fire Update: कुलिंग टॉवर बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी

SCROLL FOR NEXT