बाम्हणी- वलखेड ओढ्यात वाहून गेलेल्या दोघांना वाचवण्यात यश, एकाचा शोध सुरु लक्ष्मण सोळुंखे
महाराष्ट्र

बाम्हणी- वलखेड ओढ्यात वाहून गेलेल्या दोघांना वाचवण्यात यश, एकाचा शोध सुरु

पुलावरून पुराच्या पाण्यातून मोटारसायकल टाकल्यामुळे ३ जण वाहून गेले आहेत.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : पुलावरून पुराच्या पाण्यातून मोटारसायकल टाकल्यामुळे ३ जण वाहून गेले आहेत. त्यामध्ये दोघांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश मिळाले आहे. तर एका जणाचा शोध सुरु आहे. परतूर तालुक्यातील बामणी गावातील ही घटना, वाहून गेलेले आसाराम खालापुरे यांचा शोध सुरु आहे. घटनास्थळी तहसीलदार रूपा चित्रक, पोलिस कर्मचारी आणि ग्रामस्थ दाखल झाले आहेत.

हे देखील पहा-

मोटारसायकलही वाहून गेली आहेत. गावाचे उपसरपंच राजेंद्र खालापुरे, (वय- 35) आसाराम खालापुरे, (वय- 55) ग्रामपंचायत सदस्याचे पती आणि वालखेडचे 32 वर्षीय लखन कांबळे हे रात्री परतूरहून बामनी गावाकडे जात ही घटना घडली आहे. दिवसभर संततधार पावसामुळे बामनी गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद करण्यात आला होता.

रात्री पुलावरून पाणी वाहत असल्याने तिघांनी एक मेकाला धरून पूल ओलांडण्याचा निर्णय घेतला. आसाराम खालापुरे यांचा पाण्यात जाताच पाय घसरला आणि तिघेजण ही पाण्यात पडले आणि पाण्यात वाहून गेले आहेत. त्यामध्ये दोन जणांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले. ते बेपत्ता झालेले आसाराम खालापुरे यांचे रात्री पुलावरून आणि नदीमध्ये उशिरापर्यंत शोध घेण्याची प्रक्रिया सुरूच आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात

Mughal harem: मुघल हरममधून पळून जाणाऱ्या महिलांसोबत काय केलं जायचं?

घरी परतताना शिक्षकावर हल्ला, २ हल्लेखोरांनी डोक्यात गोळी घातली; पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Kriti Sanon: तेरे इश्क में हर रंग लाल...; क्रिती सॅननचा रॉयल लूक व्हायरल, पाहा PHOTO

Global Realty Expo : महाराष्ट्राची माती अबुधाबीत चमकली, सकाळच्या ग्लोबल रिअल्टी एक्स्पोने इतिहास रचला

SCROLL FOR NEXT