Rain Update; जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी, मांदळा लघु प्रकल्प ओव्हरफ्लो...

जालना जिल्ह्यात सकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे
Rain Update; जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी, मांदळा लघु प्रकल्प ओव्हरफ्लो...
Rain Update; जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी, मांदळा लघु प्रकल्प ओव्हरफ्लो...लक्ष्मण सोळुंखे
Published On

जालना : जालना जिल्ह्यात सकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. अनेक भागात सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर या तालुक्यासह अंबड घनसावंगी तालुक्यात पावसाळा सुरुवात झाली आहे. मागील 4 दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील मांदळा लघु प्रकल्प ओव्हरफुल झाला आहे.

हे देखील पहा-

यामुळे प्रकल्प क्षेत्रांत येणाऱ्या गावांचा पाणी प्रश्न सुटला आहे. घनसावंगी तालुक्यात अनेक भागात पिकांची नुकसान झाले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मका, तूर, उडीद, मूग, हे हाताशी आलेले पीक वाया गेले आहे. या पावसाचा फटका मोसंबी बागांना ही मोठ्या प्रमाणात बसला आहे. मोसंबी बागात ही मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने फळ उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Rain Update; जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी, मांदळा लघु प्रकल्प ओव्हरफ्लो...
राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी; परळी- अंबाजोगाई महामार्ग बंद...

जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी नुकसान ग्रस्त भागाच्या पंचनाम्याचे आदेश ही दिले आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून आध्याप ही लिखित स्वरूपात महसूल विभागाला आध्याप ही आदेश प्राप्त झाले नसल्याने पंचनामे कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे आधीच सुलतानी संकटात असलेला बळीराजा आत्ता या अस्मानी संकटात सापडला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com