Balasaheb Thorat
Balasaheb Thorat saam tv
महाराष्ट्र

Balasaheb Thorat: 'कोणी सांगितलं मी नाराज होतो', बाळासाहेब थोरात यांचा माध्यमांनाच उलटप्रश्न

Rashmi Puranik

Balasaheb Thorat: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. परंतु आज माध्यमांशी बोलताना याबाबात प्रश्न विचारला असता थोरात यांनी 'कोणी सांगितलं मी नाराज होतो' असा उलटप्रश्न केला. तसेच 'पत्र व्यवहार प्रत्येक संघटनेत होतो, तसाच आम्ही देखील केला' अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता थोरात यांची नाराजी दूर झाली का अशा चर्चा रंगल्या आहेत.

"मी कोणावर नाराज आहे, असे कोणी म्हटले? मला हे केवळ माध्यमांतूनच कळले. मी नाराज असल्याचे मी कधीच व्यक्त केले नाही", अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तुम्ही अजूनही नाराज आहेत का? असा प्रश्न विचारल्यानंतर थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांची पक्षातून हकालपट्टी केल्यापासून त्यांचे मामा आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. या संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान ते आजारी होते आणि या काळात त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देखील देणे टाळले. तसेच त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता त्यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे.(Latest Marathi News)

दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर थोरात यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली होती. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या या बैठकीनंतर थोरातांनी ही माहिती दिली होती.

यावेळी बोलताना एच के पाटील यांनी सांगितले की, बाळासाहेब थोरात यांची बाजू ऐकून घेतली आहे. थोरात दुखावले गेले, काही गैरसमज झाले आहेत, ते लवकरच दूर होतील. थोरात रायपूर येथील काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती देखील पाटील यांनी दिली. थोरातांनी देखील याला दुजोरा दिला होता. मात्र आता त्यांनी आपण नाराज नसून, पक्षांतर्गत केवळ पत्रव्यवहार केल्याचे सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Cyber Fraud: धक्कादायक! शेअर ट्रेडिंमधून पैसा कमावण्याचे आमिष; पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला ४३ लाखांचा गंडा

Sanjay Raut : मुंबई महापालिकेने पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी ३ कोटी दिले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune Rain News: विज पडल्याच्या आवाजाने घाबरुन ३ महिला पडल्या बेशुद्ध; एकीचा मृत्यू

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; सामान्यांना मोठा दिलासा

Thane Crime News: धक्कादायक! मुंबईत धावत्या ट्रेनमध्ये मॉडेलवर अत्याचार; घटनेनंतर ३९ दिवसांनी गाठले पोलीस ठाणे

SCROLL FOR NEXT