Loksabha Election 2023
Loksabha Election 2023 Saam Tv
महाराष्ट्र

Loksabha Election 2023: ... तर लोकसभेला मविआच्या ४० जागा निवडून येतील; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे वक्तव्य

Shivani Tichkule

सचिन बनसोडे

Balasaheb Thorat on Loksabha Election 2023: निळवंडे धरणाच्या कालव्यातून आलेले पाणी संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावात पोहचल्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सपत्नीक पाण्याचे जलपूजन केले. निळवंडे धरण आणि कॅनॉलसाठी थोरात यांनी केलेल्या कार्याबद्दल तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. (Latest Marathi News)

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीचाच विजय होईल, असं म्हटलं आहे. ज्यांची जिथे क्षमता जास्त आहे ते तिकीट त्या-त्या पक्षाला दिले तर लोकसभेला मविआच्या ४० जागा निवडून येतील. शरद पवार यांनी सांगितल्या प्रमाणे आम्हाला तशी काळजी घ्यावी लागेल.जनता आमच्या पाठीशी असून सध्याच्या कारभाराला वैतागली आहे. त्यामुळे विजय हा महाविकास आघाडीचाच होईल, असा दावा बाळासाहेब थोरात (Balashaheb Thorat) यांनी केला आहे.

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही जागा बाळासाहेब थोरात यांनी लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यावर लोक आग्रह करताय पण मी तसा विचार केलेला नाही. आपलं घर चांगलं सांभाळाचं आणि बाहेर मदत करायची. दुसरीकडे नवे काही करण्याची मला सवय नाही. राजकारणात व्यक्तिगत वैर मी ठेवत नाही. मात्र पक्षाकडून एखादी जबाबदारी आली तर ती कार्यकर्त्यांना पाळावी लागते असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT