Balasaheb Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Shivsena: व्यंगचित्रकार ते 4 दशके मुंबईवर हुकूमत गाजवणारे हिंदुह्रदयसम्राट! बाळासाहेबांच्या 'या' ग्रेट गोष्टी माहित आहेत का?

आयुष्यात एकही निवडणुक न लढवता राजकारणात दबदबा निर्माण करणारे, ज्यांंच्या दरबारात विरोधकही हजेरी लावायचे अशा बाळासाहेबांबद्दलच्या या थक्क करणाऱ्या गोष्टी त्यांच्या ग्रेट व्यक्तिमत्वाची ओळख करुन देतात...

Gangappa Pujari

Balasaheb Thackaray Birth Anniversary: आपल्या ज्वलंत, जबरदस्त भाषणांनी लाखो शिवसैनिकांच्या अंगावर रोमांच उभे करणारे देशाचे लाडके आणि रोखठोक वक्ते म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले जाते. बाळासाहेब ठाकरे त्यांच्या जबरदस्त भाषण शैलीसाठी आणि रोखठोक व्यक्तीमत्वासाठी प्रसिद्ध होते. आपल्या तोंडातून सुटलेला शब्द हा भात्यातील बाणाप्रमाणे असतो, तो एकदा सुटला म्हणजे सुटलाच असा त्यांचा कडक स्वभाव..

आज, २३, जानेवारी बाळासाहेब ठाकरे यांची ९७ वी जयंती. देशभरातील नेते बाळासाहेब ठाकरेंना सोशल मीडियावरुन अभिवादन करताना दिसत आहेत. (Balasaheb Thackeray)

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९४७ रोजी झाला. बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीला व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दिला सुरूवात केली होती. मात्र काही काळांनी त्यांनी ही नोकरीही सोडली, आणि मार्मिक या साप्ताहिकाला सुरूवात केली. मार्मिकमधून त्यांनी परप्रांतीयांच्या मुंबईतील वाढत्या प्रभावावर त्यांनी टीकास्त्र सोडायला सुरुवात केली. मार्मिकच्या यशानंतर बाळासाहेब ठाकरेंनी १९६६ मध्ये शिवसेना पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली.

शिवसेनेच्या स्थापनेवेळी त्यांनी शिवसेना (Shivsena) हा पक्ष नसून शिवाजी महाराजांची सेना असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेच्या स्थापनेनंतर हिंदुह्रदयसम्राटांनी चार दशके मुंबईवर हुकूमत गाजवली. स्वतः एकही निवडणूक न लढवता राजकारणावर हुकूमत गाजवणाऱ्या बाळासाहेबांबद्दलच्या या माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेवूया.

1.राजकारणात येण्यापूर्वी बाळ ठाकरे हे प्रसिद्ध क्रांतिकारक आणि व्यंगचित्रकार होते. 1950 च्या सुमारास टाइम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या आवृत्तीत त्यांची व्यंगचित्रे प्रकाशित व्हायची.

2- बाळासाहेब ठाकरेंना चांदीच्या सिंहासनावर बसण्याची आवड होती. ते असे व्यक्तिमत्व होते, ज्यांच्या दरबारात त्यांचे समर्थकच नव्हे तर विरोधकही हजेरी लावत असत.

3- बाळासाहेब ठाकरे यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते जेव्हा एखाद्याला विरोध करायचे तेव्हा ते अगदी शत्रूसारखेच वाटायचे, पण जेव्हा ते कोणाची स्तुती करायचे तेव्हा त्यांच्यापेक्षा मोठा कोणी मित्रच नाही असे वाटायचे.

4- 19 जून 1966 रोजी त्यांनी मित्रांसोबत शिवाजी पार्कमध्ये नारळ फोडून शिवसेनेची स्थापना केली. ते न पाहता भाषण करायचे आणि त्यांना ऐकण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय जमायचा.

5- बाळासाहेब ठाकरे हे असे व्यक्तिमत्व होते, जे कधीही कोणाला भेटायला गेले नाहीत. ज्याला भेटायचे आहे तो त्याच्यापर्यंत पोहोचायचा. त्यांना भेटण्यासाठी अनेक मान्यवर स्वतः त्यांच्या मुंबईतील (Mumbai) मातोश्री निवासस्थानी पोहोचत असत.

6- 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे आप की अदालत शोमध्ये पोहोचले होते, तिथे त्यांना विचारण्यात आले होते की त्यांनी हे काम शिवसैनिकांनी केल्याचे ऐकले आहे का? त्याला उत्तर देताना ते म्हणाले होते की, शिवसैनिकांनी हे काम केले असेल तर ही अभिमानाची गोष्ट आहे.

7- बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्यांचे छंदही विशेष होते. त्यांना सिगार आणि व्हाईट वाईनची आवड होती. त्यांच्या बहुतेक मुलाखती आणि फोटोंमध्ये त्यांच्या हातात सिगार दिसतो.

8- 1999 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांना मतदान करण्यास आणि निवडणूक लढविण्यास 6 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. त्यांनी आयुष्यात कधीही निवडणूक लढवली नसली तरी महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात त्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची राहिली आहे

9 -17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळ ठाकरे यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. त्यादिवशी संपूर्ण मुंबई बंद होती आणि जवळपास 5 लाख लोकांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजेरी लावली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT