Bal Thackeray Jayanti: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त PM मोदींसह दिग्गजांकडून अभिवादन

आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे.
Bal Thackeray Jayanti
Bal Thackeray JayantiSaam TV
Published On

Bal Thackeray Jayanti: आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र शिवसैनीकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत मोदींनी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधान मोदी यांचे ट्वीट

" बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्याशी माझ्या झालेल्या संवादाचा मी नेहमीच आदर करेन. त्यांना समृद्ध ज्ञान आणि बुद्धी लाभली होती. त्यांनी आपले जीवन लोककल्याणासाठी वाहून घेतले. " असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

शिवसेनेमध्ये गेल्या ६ महिन्यांपासून दोन गट पाडले गेले आहेत. बाळासाहेब उद्धव ठारके आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही गटांध्ये संघर्ष सुरू आहे. निवडणूक आयोगात पक्षचिन्ह आणि न्यायालयात मोठी लढाई सुरू आहे. तसेच आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत विधानसभेत त्यांचे तैलचित्राच लावण्यात येणार आहे. दोन्ही गटामधील वादात आज दोन्ही गटांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. तसेच सर्वच नेते मंडळींनी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त ट्वीट करत अभिवादन केलं आहे.

आज उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदाची मुदत संपत आहे. त्यामुळे आजचा दिवस फरच महत्वाचा ठरणार आहे. अशात वडलांच्या जयंतीनिमित्त त्यांनी ट्वीटरवर म्हटले आहे की, लाखो शिवसैनिकांच्या महानायकाला, महाराष्ट्राच्या महान सुपुत्राला, आमच्या मायबाप दैवताला, जयंतीदिनी विनम्र अभिवादन!"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतींस विनम्र अभिवादन, असे ट्वीट केले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बाळासाहेब ठाकरेंचा एक व्हिडिो शेअर केला आहे. तसेच खाली लिहिले आहे की, हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आम्हाला सदैव लाभत राहो"

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त एक ट्वीट पोस्ट केले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, " स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीत व कुंचल्यात सामाजिक व राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करण्याचे सामर्थ्य होते. आपल्या अमोघ वकृत्वाद्वारे मराठी माणसांच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! "

Bal Thackeray Jayanti
Shivsainik On Cycle | Balasaheb Thackeray यांची जयंती,Parbhaniचा सैनिक थेठ आला सायकलवरुन..

" शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट,आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान जपण्यासाठी खरेपणाने बोलणारा कणखर,बेधडक वक्ता असं त्यांचं निडर,पारदर्शक व्यक्तिमत्त्व होतं. या लोकप्रिय व्यक्तिमत्त्वाचं स्थान मराठी मनात अढळ राहील. ", असे ट्वीट अजित पवारांनी केले आहे.

Bal Thackeray Jayanti
Balasaheb Thackery Smrutidin | स्मृतिस्थळावर अतिशय कडक बंदोबस्त, कार्यकर्ते भिडू नयेत म्हणून खबरदारी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपल्या ट्वीटवर अकाऊंटवर बाळासाहेबांच्या भाषणाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच " या मनगटास तुच शिकवली लढण्याची वहिवाट कोट कोट हृदयांचा केवळ एक हृदय सम्राट." अशी पोस्ट राज ठाकरे यांनी शेअर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com