Parbhani Chandaj Bail Pola
Parbhani Chandaj Bail Pola  Saam TV
महाराष्ट्र

Parbhani News : जिंतूर तालुक्यात बैलपोळ्याला गालबोट; दोन गटात तुफान हाणामारी, पाहा VIDEO

राजेश काटकर

परभणी : जिल्ह्यात बैलपोळ्याच्या (Bail Pola) सण बळीराजाने मोठ्या उत्सवात साजरा केला. अशात जिंतूर तालुक्यात बैलपोळ्याच्या सणाला गालबोट लागलं. बैलपोळा साजरा करण्यावरून जिंतूर (Jintur) तालुक्यातील चांदज गावात दोन गटांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही गटातील नागरिकांनी एकमेकांना लाथा-बुक्यांनी मारहाण केली. ही घटना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. (Parbhani Jintur Todays News)

दोन गटात झालेल्या या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. प्राप्त माहितीनुसार, बैलपोळा फोडण्यावरून ही हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटातील चार ते पाच जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. जिंतूर तालुक्यातील चांदज येथे पोळ्याच्या सणानिमित्त गावातून बैलाची मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक संपल्यानंतर दोन्ही गटात वाद झाला.

दरम्यान, हा वाद इतका विकोपाला गेला की, वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. दोन्ही गटाकडून एकमेकांना शिवीगाळ करत, दगड, वीट तसेच लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. या घटनेत ४ ते ५ जण जखमी झाले आहे. जखमींपैकी गणेश साहेबराव अंभुरे आणि बालासाहेब पाराजी अंभुरे या दोघांची प्रकृती गंभीर आहे. (Jintur ChandajTodays News)

दोघांनाही प्राथामिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वसंत मुळे यांनी पोलीस पथकासह तातडीने चांदज गावात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

सध्या चांदज गावात पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २० ते २५ जणांचा ताब्यातही घेतलं आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...

SRH vs PBKS: अखेरच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांची बॅट तळपली! हैदराबादसमोर विजयासाठी २१५ धावांची गरज

Today's Marathi News Live: पिंपरी चिंचवड शहरात आज पुन्हा वळवाच्या पावसाची हजेरी

Singapore Corona News |चिंता वाढली! सिंगापूरमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर

Yogi Adityanath: मोदी तिसऱ्यांदा PM झाल्यास 6 महिन्यात POK भारताच्या ताब्यात असेल, योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT