Vitthal Rukmini, Pandharpur Saam TV
महाराष्ट्र

Pandharpur News : श्रद्धेचा झरा... शेती विकून विठुरायाला 25 तोळ्यांचा सोन्याचा करदोडा, रुक्मिणीस दोन तोळ्याचे मंगळसूत्र

धाराशिव जिल्ह्यातील भाविकाच्या विठ्ठल भक्तीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

भारत नागणे

Pandharpur News : समस्त महाराष्ट्राचे दैवत असलेला विठूरायाने सर्वांच्या हदयात अढळ स्थान मिळविले आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी अबालवृद्ध जीवाचे रान करतातच पण त्याच्या काैतुकासाठी भाविक काहीही करायला तयार असतात. अशाच एका भक्ताने विठ्ठल भक्तीतून आपली सहा एकर शेती विकून विठुरायासह रुक्मिणी मातेला साेन्याची आभूषणे केली आहेत. (Maharashtra News)

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठुरायाच्या चरणी धाराशिव (dharashiv) जिल्ह्यातील बाई लिंबा वाघे (bai limba waghe) या विठ्ठल भक्ताने स्वत:ची सहा एकर शेती विकून लाडक्या विठुरायाला 18 लाख रुपयांचा 25 तोळ्याचा सोन्याचा करदोडा अर्पण केला आहे.

बाई लिंबा वाघे यांची धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी या गावात 11 एकर शेती आहे. त्यांना वारसदार नसल्याने त्यांनी 78 लाखाला सहा एकर शेती नुकतीच विकली आहे. शेती विकून आलेल्या पैशातून आपल्या लाडक्या विठुरायाला (vitthal) 18 लाख रूपयांचे 25 तोळे वजनाचा सोन्याचा करदोडा तसेच रुक्मिणी मातेला दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले आहे.

बाई लिंबा वाघे यांच्या विठ्ठल भक्तीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. तसेच त्यांच्या या कार्याचे भाविकांकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील कौतुक केले जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून तातडीचा 'रेड अलर्ट' जारी

Death News : सैराट फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन! ब्रेनहॅमरेजमुळे घेतला अखेरचा श्वास

Mumbai : पत्नीला धडा शिकवण्यासाठी छायाचित्रकाराचं भयंकर कृत्य, १० वर्षांच्या मुलाची समुद्रात बुडवून हत्या

Nagpur News: क्रिकेट टीममध्ये निवड झाली नाही, १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूने उचललं टोकाचं पाऊल, नागपूरमधील हृदयद्रावक घटना

Breaking : भिवंडीत ४ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काहींचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT